परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

वैद्यनाथ विद्यालयात गुरूजन कृतज्ञता सन्मान सोहळ



गुरूजन कृतज्ञता सन्मान सोहळा हर्षोल्लाहासात!


परळी दि.05
येथील वैद्यनाथ विद्यालयातील 1987 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या बॅचच्या शाळेतील (प्राथमिक आणि माध्यमिक विभाग) गुरूजनांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन.पी.मोदी हजर होते. तसेच शाळेतील माजी दिवंगत शिक्षकांच्या पत्नींना सुध्दा सत्कारासाठी विशेष निमंत्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आदरणीय माजी मुख्याध्यापक दत्तात्रय ईटके सर, शिवाजीराव देशमुख पोहनेरकर, गाढे सर, पी.एस.घाडगे सर, मुकूंद चुंबळकर सर, हरिभाऊ चव्हाण सर, आबा वाघमारे सर, टिवटणकर सर, डाबीकर सर, राजनाळे सर, लोढा सर, गुलाबराव देशमुख सर, भाऊसाहेब देशमुख, काटकर सर, डांगे सर, सरकटे सर, धसकटे सर, चौंडे सर, रावसाहेब देशमुख सर, पाशा सर, सु.दे.लिंबेकर सर, गुळभिले सर,भातांगळे सर, शोभाबाई, विजयबाई जोशी, यांनी सत्कार स्वत: स्विकारला  तर दिवंगत कै.महेशअप्पा खानापुरे, कै.ल.ता. साखरे, कै. राजेश्वरराव देशमुख, कै. शिवदास राघुसर, कै.अनंतराव देशमुख, कै. खांडवे सर, कै.बापुसाहेब देशमुख, कै.बाबुराव कुकडे सर यांच्या स्मरनार्थ त्यांच्या सुविद्य पत्नींनी सत्कार स्विकारला.
यावेळी 1987 च्या बॅचमधील 160 मुल आणि मुलींनी हिरीरीने सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये सुत्रसंचलन तानाजी देशमुख,महादेव धायगुडे, रमेश चौंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष पुजारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैजनाथ बागवाले, दिपक देशमुख, महादेव ईटके, विकास हालगे, प्रकाश औटी, बाळकृष्ण विर्धे, भुराज बदने, शेख सिराज, मारोती डहाळे, महाविर संघई, जगदीश नावंदर, एहेतेशाम सिध्दीकी, राजेश साखरे, विजयकुमार शास्त्री, नितीन कुलकर्णी, अनिरूध्द डहाळे, श्रीकांत जोशी, ताजोद्दीन, नरेश पिंपळे, माऊली फड, नितीन शिंदे, मन्मथ कापसे, विजय पुजारी, गिरीष राघु, विष्णु साखरे, संदिप चौधरी, श्रीकांत देशमुख, शंकर ताटे, शेखर चौधरी, आघाव महाराज, दिगांबर फटाले, प्रा.अंगद फड, संजय गाडे, संजय पाटील, सतिश रेवडकर, सुनिल वानरे, वैजनाथ टेकाळे, अजय अवचारे, शंकर साळवे, संजय कोरे, दिनेश जैन, सुभाष कसबे, सिध्देश्वर शेटे, सुष्मा देशमुख, दिपा देशमुख, रेखा हालगे, शोभा डाके, राजश्री देशमुख, निर्मला लोखंडे, आदिंनी सहभाग नोंदविला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!