.........तर तुम्हा -आम्हाला मतदानाचा अधिकार पण ठेवणार नाहीत - धनंजय मुंडेंचा हल्लाबोल


.........तर तुम्हा -आम्हाला मतदानाचा अधिकार पण ठेवणार नाहीत - धनंजय मुंडेंचा हल्लाबोल 
बीड दि. 29............... बाहुबली या गाजलेल्या हिंदी चित्रपटा ज्या प्रमाणे अत्याचारी भल्लाळदेव याची सत्ता होती, जनतेच्या मनावर राज्य मात्र बाहुबलीचे होते. त्याचप्रमाणे श्री.छगन भुजबळ साहेब हे राजकारणातील बाहुबली असून, राज्य आणि केंद्रातील अत्याचारी भल्लाळदेवची सत्ता आता आपल्याला उलथवून टाकायची आहे. असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

बीड येथे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आयोजित समता परिषदेच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून श्री.मुंडे बोलत होते.

महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा विचार दिला, आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांनी हेच कार्य पुढे नेण्याचे कार्य केले. आता भुजबळ साहेबांच्या समर्थ नेतृत्वाखाली समता परिषदेच्या माध्यमातून हे कार्य जोमाने सुरू आहे. या सामाजिक क्षमतेच्या परिवर्तनाच्या लढाईत माझ्यासारखे असंख्य कार्यकर्त त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढतील असे श्री.मुंडे म्हणाले.

केंद्र आणि राज्यात परिवर्तनाचा संकल्प करण्यासाठी सोमवारी बीड येथे खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत होणार्‍या विजयी संकल्प सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही श्री.मुंडे यांनी केले.

२०१९ ला हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर तुम्हा -आम्हाला मतदानाचा अधिकार पण ठेवणार नाहीत  असा धनंजय मुंडेंनी  सरकारवर हल्लाबोल केला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !