पोस्ट्स

इमेज
 * नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून १५० कोटी रूपये वितरित* *पंकजाताई मुंडेंनी मानले सरकारचे आभार* बीड ।दिनांक २२। अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाने स्वतःच्या हिश्याचे १५० कोटी रूपये आज वितरित केले. या निर्णयाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सरकारचे आभार मानत या निधीमुळे रेल्वेमार्गाच्या कामाला अधिक गती येईल असे म्हटले आहे.      नगर-बीड-परळी या २६१.२५ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा अंदाजित खर्च २८२६ कोटी रूपये इतका होता. प्रकल्पाच्या खर्चात केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा पन्नास -पन्नास टक्के इतका असल्याने राज्य हिस्सा १४१३ कोटी रूपये इतका होता. शासन निर्णयानुसार ४५०८.१७ कोटी रूपये इतक्या अंदाजित खर्चास राज्य शासनाने दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्पाच्या खर्चापैकी रूपये २४०२.५९ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा शासन मध्य रेल्वेला देणार आहे. ३१ मार्च २०२२ अखेर राज्य सरकारने १४१३ कोटी रूपये इतका निधी दिला असून हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०२२-२३ करिता १५० कोटी रूपये इतका निधी राज्याने आज मध्य रेल्वेकडे वर्ग केला आहे. *पंकजा
इमेज
  शिवमहापुराण कथा प्रवक्ता प.पु प्रदीपजी मिश्रांची वैद्यनाथ दर्शन घेऊन परळीतून विदाई परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....          पवित्र श्रावण पर्वकाळात बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रावर 15 ऑगस्ट पासून शिवमहापुराण कथा विशद करून भाविकभक्तांना मंत्रमुग्ध करून टाकणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा प्रवक्ते प.पु. प्रदीप मिश्रा यांनी आज चौथ्या श्रावणी सोमवारी प्रभुवैद्यनाथाचे दर्शन घेऊन परळीतून विदाई घेतली.          सोमानी परिवाराच्या वतीने परळीत शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या शिव महापुराण कथेला महाराष्ट्रसह परराज्यातील श्रोत्यांची, भाविकांची मोठ्या संख्येने सात दिवस उपस्थिती लाभली. आपल्या अमोघ वाणीतून  मंत्रमुग्ध करून टाकणारे कथा प्रवक्ता प.पु. प्रदीप मिश्रा यांच्या कथेने परळीतील वातावरण भक्तीमय झाले होते.काल दिनांक 21 रोजी सायंकाळी या कथेचा समारोप झाला. आज दि.22 श्रावणातील अखेरचा चौथा सोमवार होता. त्यानिमित्ताने प. पु प्रदीपजी मिश्रा यांनी ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे सकाळी दर्शन घेतले व पुढील प्रवासासाठी ते मार्गस्थ झाले.  ए

MB NEWS-परळी शिवसेनेतही वाटणी: शिंदेसेेनेत शिवाजीराव शिंदेअनेक कार्यकर्त्यांसह दाखल

इमेज
परळी शिवसेनेतही वाटणी: शिंदेसेेनेत शिवाजीराव शिंदे अनेक कार्यकर्त्यांसह दाखल  परळी वैजनाथ दि.         अखेर परळी वैजनाथ तालुक्यातही ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते, प्रमुख वक्ते शिवाजीराव शिंदे यांनी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे सेना वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले.          राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्या तरी परळी तालुक्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना मजबूत असल्याचे दिसत होते. मात्र अखेर इथेही ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे व्यासपीठ गाजवणारे प्रमुख वक्ते आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या उपस्थितीत बीड येथे शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश केला.          जेष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांच्यासह युवा सेनेचे विधानसभा प्रमुख बाबा सोनवणे, शिवसेना सचिव रामराव माने, सिरसाळा सर्कल प्रमुख विश्वनाथ राठोड, सिरसाळा शहर प्रमुख कैल
इमेज
  महाराष्ट्र टुरिझमच्या पेजवर झळकला ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची माहितीपट परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिर चा माहितीपट राज्य शासनाची संस्था असलेल्या महाराष्ट्र टुरिझमच्या पेजवर झळकला आहे. विनाकारण ज्योतिर्लिंग स्थानाबाबत तथाकथित संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र टुरिझम ने बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग स्थान म्हणून प्रदर्शित केलेला हा माहितीपट या अर्थाने विशेष महत्त्वाचा आहे. Click&Read: *अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्त परळीत अलोट गर्दी !* ● _देशभरातील शिवभक्तांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन_        सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. या निमित्ताने गेल्या महिनाभरात पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक परळीत दाखल झाले व मनोभावे वैद्यनाथाचे दर्शन घेतले. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे धर्मशास्त्र संमत व अधिकृत ज्योतिर्लिंग स्थान आहे. मात्र काही ठिकाणी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थानाबाबत संभ्रम निर्माण कर
इमेज
 *अखेरच्या श्रावणी  सोमवार निमित्त परळीत अलोट गर्दी !*   ● _देशभरातील शिवभक्तांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन_ परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ......              देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत आज अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्तदर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. देशभरातील विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. काल (दि.२१) रविवारपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.  दर्शन रांगांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले.          पवित्र  श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत आज दि. २२ रोजी अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल   झालेआहेत. कालपासूनच भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळत होती . मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला.  वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी पोलिसांनी ही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.   Click &Read: ● *श्रावण पर्व: महाराष्ट्र टुरिझमच्या प
इमेज
  घ्या आता.....चक्क पोलीस कॉलनीत- पोलीस कॉर्टर समोर -हँडल लॉक केलेल्या मोटरसायकलवर चोरट्यांचा डल्ला परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           परळी शहर व तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. काही केल्याने चोरांचे  डल्लासत्र थांबता थांबत नाही. दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्यांच्या घटना घडताना दिसत आहेत. चोरीच्या  या सत्रांमधून कोणताही स्तर सुटलेला नाही. आता तर चक्क चोरट्यांनी पोलीस कॉलनीतच डल्ला मारला आहे. पोलीस कॉलनीत एका पोलीस क्वार्टर समोर हँडल लॉक करून लावलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्याने पळविल्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                 याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 20 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत परळीच्या पोलीस क्वार्टर समोर फिर्यादी बळीराम प्रभाकर कसबे रा. पोलीस कॉलनी यांची 35 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस हिरो होंडा मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून चोरून नेली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास पो
इमेज
  .......म्हणून परळीच्या या आजींचा झाला आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरून सन्मान परळी वैजनाथ (प्रतिनिधी)         शिवभक्तीचा दृढ निश्चयी भाव एका आजींनी दाखवून दिला.शिवमहापुराण कथेच्या सातही दिवस एका विशिष्ट जागेवरून आजींनी उभे राहून  कथा  ऐकली. शिवमहापुराण ऐकण्यासाठी देशभरातील भाविक परळीत दाखल झाले होते.      कथा मंडपात एका आजींनी सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. या आजींनी सात दिवस उभे राहून शिवकथा ऐकली. शिवभक्ताचा हा दृढ भाव पाहून कथाव्यास प.पु.प्रदीप मिश्राही भारावून गेले. कथा समारोप प्रसंगी त्यांनी आजींना व्यासपीठावर बोलावून पुष्पहार व श्री वैद्यनाथाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला. दरम्यान या शिवमहापुराण कथेचे आस्था चैनल वरून थेट प्रसारण करण्यात येत होते. या आजीबाईंना व्यासपीठावर बोलून त्यांचा सन्मान करण्यात आला व त्याबद्दल कथावाचक प.पु. प्रदीप जी मिश्रा महाराज यांनी विशेष उल्लेख करत आजीबाईंच्या नावाचा नाम उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. शिवभक्तीची दृढता व श्रद्धा याबद्दल विशेष उद्गार काढले .त्यामुळे कथामंडपात उपस्थित तसेच जगभरात बघत असलेल्या चॅनल पाहणाऱ्या भाविकांमध्ये या आजीबाई
इमेज
  सनातन हिंदू धर्म श्रेष्ठ आहे,त्याचा सन्मान करा - प.पु.प्रदीप मिश्रा *_सात दिवस कथा ऐकलेल्या आजींचा केला व्यासपीठावर सन्मान* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.२१- सनातन हिंदू धर्म श्रेष्ठ आहे,त्याचा सन्मान करा असे प्रतिपादन प.पु. प्रदीपजी मिश्रा यांनी कथेच्या विश्राम दिनी केले.देशातील पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथाच्या पावन भूमीत मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिव महापुराण कथेची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.मुख्य यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यांच्या नियोजनाचे कौतुक महाराजांनी यावेळी केले.वैजनाथाची परळी नेहमी स्मरणात राहील, येथील भक्तांचा सेवा भाव मोठा आहे.माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची कथेसाठी उपस्थिती होती त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सनातन धर्म रक्षणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.सनातन हिंदू धर्म श्रेष्ठ आहे,त्याचा सन्मान करा.गौ सेवा करा,तेहतीस कोटी देव असल्याने आपल्याला इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही.भगवंत नेहमीच मानवाच्या हृदयात निवास करतो.या कथेचा संकल्प प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने झाला आहे, वैद्यनाथाचा महिमा कितीही सांगितला तरी तो कमीच आहे.आपली बुद्धी,कार्य,मन शिवमय राहो
इमेज
  ॥ वैद्यनाथ स्तुतीगान ॥ वैद्यनाथा  वैद्यनाथा  पार्वती शिव प्रिय  वैद्यनाथा  भस्मांकीत शिव  वैद्यनाथा  निळकंठ धारका वैद्यनाथा  आदीनाथा शिव वैद्यनाथा  जटाधारी शिव वैद्यनाथा  धन्वंतरि शिव वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा॥धृ॥ नंदी वाहना वैद्यनाथा  भवरोग हारक वैद्यनाथा  भैरव पालका वैद्यनाथा  तांडव नृत्य वैद्यनाथा दुष्ट संहारक वैद्यनाथा दुरित निवारक वैद्यनाथा शिस्त पालक वैद्यनाथा कष्ट निवारक वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥१॥ कर्पुरवर्णा  वैद्यनाथा  गंगा धारक वैद्यनाथा  नरमुंड माला वैद्यनाथा  मेरू धारक वैद्यनाथा  गिरीजा निवासा वैद्यनाथा  पंचमुख धारक वैद्यनाथा  ञिशुल धारक वैद्यनाथा  डमरू धारक वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥२॥ चिलीया रक्षका वैद्यनाथा  देवादी देवा वैद्यनाथा  उमापती तू वैद्यनाथा  अमृतधारी वैद्यनाथा  हरी हरा तू  वैद्यनाथा  भू कैलासा वैद्यनाथा  भूजंग भूषणा वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥३॥ सृष्टी काळ वैद्यनाथा  अनाथ रक्षका वैद्यनाथा  धरणी नायका वैद्यनाथा  रूद्रमाळ गळा वैद
इमेज
  पं .यादवराज फड यांची  परळी येथे मैफिल               परळी - विठ्ठल रुक्मिणी आणि संत सेना महाराज यांच्या मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त किराणा घराण्याचे प्रख्यात गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं. यादवराज फड यांच्या गायनाची बहारदार मैफिल सोमवार दि. 22आॅगस्ट रोजी रात्री 8 वा. समता नगर येथे आयोजित केली आहे.   Click &watch: ● *वैद्यनाथाला आज रविवारपासूनच प्रचंड गर्दी; उद्या चौथ्या सोमवारी गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._  अभंगवाणीच्या या कार्यक्रमात ते संत सेना महाराजांच्या रचना आवर्जून सादर करणार आहेत. त्याना तबला शेखर दरवडे, हार्मोनियम मकरंद खरवंडीकर टाळ - आनंद टाकळकर, गायन साथ सुनील पासलकर हे कलाकार साथसंगत करतील, या सुवर्ण संधीचा संगीत प्रेमी रसिकांनी आवश्य लाभ घ्यावा असे नाभीक महामंडळ,समतानगर मित्र मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. -------------------------------------------------------- क्लिक करा व पहा: *कत्तलखान्याकडे जाणार्‍या 40 गोवंशीय जनावरांची सूटका* क्लिक करा व पहा: ● *थेट अयोध्येतून: श्रीराम मंदिर निर्माण कार्यशाळेत सुरु अ
इमेज
  परळी तालुक्यात चंदनचोरांचा धुमाकूळ:९७ हजारांचे चंदन व दोघांना पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      परळी तालुक्यात चंदनचोरांचा धुमाकूळ सुरुआहे. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९७ हजारांचे चंदन व दोघांना पकडले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सिरसाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत. क्लिक करा व पहा: *●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण....सप्तम दिन*     सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२०.०८.२०२२ रोजी १०.०० वा. मौजे वांगी गावाचे उत्तरेकडील पडीक जमिनीत यातील हाकानी बाबुराव मानपाडे रा.तिप्पानानगर, अहमदपुर व गंगाधर निवृत्ती जाधव रा.हाडुळकी ता अहमदनगर जि लातुर या दोन आरोपीतानी संगनमत करून मौजे वांगी गावाचे उत्तरेकडील पडीक जमिनीत स्वताच्या फायदयाकरिता चंदनाची झाडे तोडली. क्लिक करा व पहा: ● *थेट अयोध्येतून: श्रीराम मंदिर निर्माण कार्यशाळेत सुरु असलेल्या कोरीव कामांचा आढावा.* #mbnews _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._ दोन इसमांनी चंदनाची झाडे तोडुन आनून चंदनाच्या खोडापासून चंदनाचा गाभा कुन्हाडीने तासून चंदनाची तस्करी करीत आसताना  मिळुन आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात
इमेज
●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण  ●थेट प्रक्षेपण......   परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे.

MB NEWS-पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

इमेज
  कत्तलखान्याकडे जाणार्‍या 40 गोवंशीय जनावरांची सूटका पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई बीड ः दोन पीकअपसह एका आयशर टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरे घेऊन जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी कारवाई करत 40 जनावरांची सूटका करण्यात आली. यावेळी पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. जामखेड येथून दोन पिकअप व एका आयशर टेम्पोमध्ये बीडकडे नेली जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास हजारे यांना शनिवारी सकाळी मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा लावत चुंबळी फ ाटा येथे ही वाहने अडवली असता त्यामध्ये गोवंशीय 40 जनावरे नेली जात होती. अतिशय निर्दयीपणे या जनावरांना वाहनांमध्ये कोंडण्यात आले होते. या जनावरांची सूटका करत पोलिस पथकाने  सय्यद खलील सय्यद शौकत  (रा. मोमीनपुरा), मोमीन शफिक मोमीन इस्माईल (रा. मोहम्मदया कॉलनी पेठ बीड),  नशीर दिबंजी कुरेशी (रा. खंडेश्वरी मंदिर जवळ, पेठ बीड), मझहर सलाम कुरेशी  (रा.पाथरूड), रजाक दगडू कुरेशी (रा. मादळमोही ता.गेवराई जिल्हा बीड) यांना ताब्यात घेतले. या सर्वांनी वाहन मालक क
इमेज
  आरटीओच्या बनावट सह्या करुन गाडीची पासिंग बीडमध्ये वरिष्ठ लिपीकासह एजंटवर गुन्हा दाखल बीड ः दुसर्‍या जिल्ह्यात नोंदणी झालेल्या वाहनास बीड जिल्ह्याची पासिंग करुन देण्यासाठी आरटीओच्या बोगस सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात कार्यालयातीलच वरिष्ठ लिपीकासह एजंटवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडचे आरटीओ कार्यालय वेगवेगळ्या गैरप्रकारांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांनी एजंट सय्यद शाकेर सय्यद अहेमद याच्याशी संगनमत करत एआर 9 पी 2283 या वाहनास बीड जिल्ह्याची पासिंग देण्यासाठी यापूर्वी कार्यरत असलेले आरटीओ वैभव राऊत आणि नोंदणी प्रभारी संदिप खडसे यांच्या बोगस सह्या केल्या व या चोरीच्या वाहनास एमएच 23 बीसी 5367 ही बीड जिल्ह्याची पासिंग दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक साबळे हे करीत आहेत.
इमेज
  वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकासाबाबत  पंतप्रधान मोदींना शिफारस करा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चेतन सौंदळे यांचे निवेदन        द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा याकरिता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिफारस करण्याची मागणी बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्यपाल प्रभू वैद्यनाथZee] ज्योतीर्लिंगाचे दर्शन करण्याकरिता शुक्रवारी परळी येथे आले असता प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली आहे.     भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रूग्णालयसह,विमानतळ,चौपदरी राष्ट्रीय महामार्ग,त
इमेज
  अहंकार मानवाच्या पतनाचे कारण - प.पु. प्रदीप मिश्रा उद्या होणार कथेची सांगता🔸 परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२० - अहंकार  मानवाच्या पतनाचे कारण बनतो, म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार होऊ देऊ नका असे प्रतिपदान प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी सहाव्या दिवशीच्या कथेत केले.येथील मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेत त्यांनी शिवमहिमा वर्णीत केला.कथेचे श्रवण करण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या मराठी भजनावर भाविकांनी ठेका धरला होता.            कर्ता करविता भगवान शंकर आहेत,सर्व सृष्टी त्याच्या आधीन आहे.म्हणून शिव निंदा करू नये.भगवान शंकराला आपल्या जीवनात आलेले दुःख सांगा त्यापासून ते मुक्त करतात.मानवाच्या अहंकाराचे हरण फक्त भगवंतच  करू शकतो.भगवंताची केलेली सेवा फळ देतेच म्हणून आपण देवाची नित्य सेवा केली पाहिजे.कणा कणांत शंकर आहे असे महाराजांनी कथेचे विवेचन करतांना सांगितले.      शिव निंदा केल्याने शापित झालेल्याम हर्षी नारदांनी चंद्रभागे तिरी व्रत करत स्वतःला शाप मुक्त करून घेतले होते.भगवान शंकर,विष्णूंचे वरदान म्हणजे पंढरपूर येथील चंद्रभागा नदी आहे.सगळ्या नद्
इमेज
संयम संपला: परळी तालुक्यातील या गावात झालं अनोखं आंदोलन परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे रेवली येथे गाव रस्त्यासाठी नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. याच पाण्यात बसून ग्रामस्थांनी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शनिवारी सकाळी मौजे रेवली येथील नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्यावर घाण पाण्यात बसत आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून गावात येणारा मुख्य रस्ता करावा अशी मागणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. याबद्दल सतत पाठपुरावा केला, मात्र अद्यापही रस्त्याच्या प्रश्नाला प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले नाही. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाल्याने चिडलेल्या नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. येत्या आठ दिवसांत रस्ता न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
इमेज
 *आ.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते रविवारी हनुमान नगर येथील श्री.कृष्णमुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलाशारोहण सोहळा* परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         शहरातील हनुमान नगर, डोंगर तुकाई रोड भागात उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते हा सोहळा होणार आहे.              श्री कृष्ण मंदिर, श्रीकृष्ण चौक, हनुमान नगर, डोंगरतुकाई रोड, परळी वैजनाथ येथे रविवार दि. २१/८/२०२२ रोजी श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला गुरु कांंच बसवेश्वर मठ संस्थान, पाथरीचे श्री.ष.ब्र.१०८ गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज, श्री. ह. भ. प. गणेश महाराज जाधव परतुरकर, ह. भ. प. श्री. विठ्ठल महाराज उखळीकर, श्री.ह.भ.प. शिवहरी महाराज भाकरे कृष्ण नगर, अंबलवाडी यांचे आशिर्वचन लाभणार आहेत.पुजा विधी पौरोहित्य श्री. उमाकांत स्वामी हे करणार आहेत. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून न. प.. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, नगराध्यक्ष
इमेज
 *राज्यपाल कोश्यारी गोपीनाथ गडावर ; लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन*  *"मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी"* परळी । दिनांक २०। "गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या.     राज्यपाल कोश्यारी यांचे काल परळी शहरात आगमन झाले, त्यांचा चेमरी विश्रामगृहात मुक्काम होता. आज सकाळी लातूरकडे जातांना गोपीनाथ गडाला त्यांनी आवर्जून भेट दिली आणि मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्मारक उभा केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे हे काम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे असं सांगत  "मुंडेजी मेरे सहयोगी और मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत त्यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यपालांनी या भेटीत मुंडे साहेबांचा पुतळा आणि    गड परिसराची पाहणी केली.     यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हयातील व तालुक्यातील पदाधिकारी, लोक प्रति

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......

MB NEWS-मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान

इमेज
  महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी राज्यपालांना परळीतील युवकांकडूनअनोखी भेट    मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       आपल्या विविध वक्तव्यांनी वाद ओढवून घेणारे व महाराष्ट्राबद्दल आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र अस्मितेची जाणीव नसल्याच्या टिकेचे धनी ठललेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे परळीत आले असतांना त्यांना महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी भेटवस्तू काही युवकांनी दिली.एकप्रकारे ही भेट सकारात्मकता जपत खोचक अशी अनोखी भेट ठरली आहे.            वैभवशाली महाराष्ट्रातील गौरवशाली मराठवाड्याची उन्नत परंपरा दर्शवणारी छायाचित्र प्रतिमा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना काही युवकांनी भेट दिली. राज्यपाल भगतसिंग कोशियारी आज देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथाच्या दर्शनाला आले होते.  अनेकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे व सहकारी युवकांनी राज्यपालांंची भेट घेतली.जाणीवपूर्वक महाराष्ट्र अस्मितेची जाणीव करुन देणारी  व महाराष्ट्राबद्दल आभिमान बाळगा असा अप्रत
इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्राला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार परळी (प्रतिनिधि)           पर्यावरण व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल "कौन्सिल ऑफ एनव्हायरो एक्सलन्स फाऊंडेशन" तर्फे दिला जाणारा व राष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा समजला जाणारा "राष्ट्रीय पर्यावरण उत्कृष्टता पुरस्कार -२०२२" हा पुरस्कार परळी औष्णिक विद्युत केंद्राला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी मिळाला आहे.या पुरस्काराने मराठवाड्यातील एकमेव असणाऱ्या या विद्युत केंद्रांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  दिनांक १७ व १८ऑगस्ट रोजी "थर्मल पॉवर स्टेशन प्लांट मधील वायू गुणवत्ता नियंत्रण प्रणाली" या विषयावर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील  तज्ञांची मार्गदर्शने झाली. या परिषदेत परळी केंद्रातील कार्यकारी रसायन शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. दिनांक १८ रोजी  दुपारच्या सत्रात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली केंद्राच्या वतीने कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ कान्होबा शंकर  तूपसागार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावर्षी मे २०२२ मध्ये ही जलव्यवस्थापन साठी दोन राष्ट्रीय पुरस्क
इमेज
 *परसराम पवार यांना मातृशोक;कलुबाई  पवार यांचे निधन*  परळी वै.ता.१९ प्रतिनिधी परळी तालुक्यातील कौडगाव (घोडा) येथील  कलुबाई बालु पवार (वय७९वर्षे) यांचे शुक्रवारी (ता.१९) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी (ता१९) सकाळी नउ वाजता कौडगाव (घोडा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.   कलुबाई बालु पवार या अतिशय मनमिळावू कुटुंब उत्सव म्हणून परिचित होत्या . काही दिवसापासून त्या अल्पशः आजारी होत्या या आजारातूनच त्यांची प्राणजोत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्या जेष्ठ नेते परसराम पवार व वाहक नारायण पवार यांच्या मातोश्री होत्या. कलुबाई पवार यांचा राख सावडण्याचा विधी रविवारी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे.
इमेज
  राज्यपालांचे परळीत जोरदार स्वागत : आज मुक्काम; उद्या सकाळी जाणार गोपीनाथगडावर * कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादात राज्यपालांनी दिला मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा !* * राज्यपाल उद्या गोपीनाथ गडावर जाणार* परळी ।दिनांक १९। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज शहरात आगमन झाले. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधतांना त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.    राज्यपाल कोश्यारी यांचे दुपारी ३.४५ वा. शहरात आगमन झाले. श्रावण महिन्यानिमित्त वैद्यनाथ मंदिरात जाऊन त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचेसह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.   दर्शनानंतर राज्यपाल कोश्यारी यांचे चेमरी विश्रामगृह येथे आगमन झाले, याठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, वैजनाथ जगतकर, संदीप लाहोटी, नगरसेविका उमाताई समशेट्टे,
इमेज
  23 ऑगस्ट रोजी सिटू कामगार संघटनेचे परळीत जिल्हा अधिवेशन जिल्हाध्यक्ष काॅ. बी.जी. खाडे यांची माहिती  परळी वैजनाथ, प्रतिनिधी       बीड जिल्हा सिटू कामगार संघटनेचे जिल्हा अधिवेशन 23 ऑगस्ट रोजी परळी येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती बीड जिल्हाध्यक्ष बी.जी. खाडे यांनी दिले आहे.           परळी येथील जाजुवाडी विठ्ठल मंदिरात दिनांक 23 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र सिटू चे अध्यक्ष कामगार नेते व बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. डी एल कराड यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनाला सिटूचे सरचिटणीस कॉम्रेड एम एम शेख, कोषाध्यक्ष के आर रघु प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात केंद्र सरकारने बदललेले कामगार कायदे, सरकारचे कामगार विरोधी धोरण, कामगारांचे प्रश्न, शेतकरी व कामगारांचा एकत्रित लढा आदी विषयावर डॉ. कराड सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. बीड जिल्ह्यात सिटू अंतर्गत काम करणाऱ्या सात कामगार संघटना असून कामगारांची सभासद संख्या 1600 आहे. कामगारांचे शंभर प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता हे अधिवेशन सुरू होण