शिवमहापुराण कथा प्रवक्ता प.पु प्रदीपजी मिश्रांची वैद्यनाथ दर्शन घेऊन परळीतून विदाई

परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....
         पवित्र श्रावण पर्वकाळात बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रावर 15 ऑगस्ट पासून शिवमहापुराण कथा विशद करून भाविकभक्तांना मंत्रमुग्ध करून टाकणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा प्रवक्ते प.पु. प्रदीप मिश्रा यांनी आज चौथ्या श्रावणी सोमवारी प्रभुवैद्यनाथाचे दर्शन घेऊन परळीतून विदाई घेतली.

         सोमानी परिवाराच्या वतीने परळीत शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या शिव महापुराण कथेला महाराष्ट्रसह परराज्यातील श्रोत्यांची, भाविकांची मोठ्या संख्येने सात दिवस उपस्थिती लाभली. आपल्या अमोघ वाणीतून  मंत्रमुग्ध करून टाकणारे कथा प्रवक्ता प.पु. प्रदीप मिश्रा यांच्या कथेने परळीतील वातावरण भक्तीमय झाले होते.काल दिनांक 21 रोजी सायंकाळी या कथेचा समारोप झाला. आज दि.22 श्रावणातील अखेरचा चौथा सोमवार होता. त्यानिमित्ताने प. पु प्रदीपजी मिश्रा यांनी ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे सकाळी दर्शन घेतले व पुढील प्रवासासाठी ते मार्गस्थ झाले.  एक प्रकारे प्रभू वैद्यनाथांकडूनच प्रदीप जी मिश्रा यांनी आज परळीतून दर्शन घेऊन विदाई घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !