वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकासाबाबत  पंतप्रधान मोदींना शिफारस करा 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चेतन सौंदळे यांचे निवेदन

       द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा याकरिता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिफारस करण्याची मागणी बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्यपाल प्रभू वैद्यनाथZee] ज्योतीर्लिंगाचे दर्शन करण्याकरिता शुक्रवारी परळी येथे आले असता प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली आहे.

    भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रूग्णालयसह,विमानतळ,चौपदरी राष्ट्रीय महामार्ग,तीर्थक्षेत्र व ईतर ठिकाणी रेल्वेसेवा सुरू करणे तसेच उद्योग,व्यापार,रोजगार,स्वंय रोजगार,पर्यटन विकास तसेच विविध विकास कामांसाठी सोळा हजार कोटींचा विकासनिधी देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग परळीसह महाराष्ट्र व भारत देशातील ज्योतीर्लिंगाचा विकास करण्याची मागणी नगरसेवक चेतन सौंदळे सह माजी नगरसेवक बाळूशेठ लड्डा,आडत व्यापारी राजेश कांकरिया व त्यांच्या सहकार्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार