परळी औष्णिक विद्युत केंद्राला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार



परळी (प्रतिनिधि) 


         पर्यावरण व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल "कौन्सिल ऑफ एनव्हायरो एक्सलन्स फाऊंडेशन" तर्फे दिला जाणारा व राष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा समजला जाणारा "राष्ट्रीय पर्यावरण उत्कृष्टता पुरस्कार -२०२२" हा पुरस्कार परळी औष्णिक विद्युत केंद्राला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी मिळाला आहे.या पुरस्काराने मराठवाड्यातील एकमेव असणाऱ्या या विद्युत केंद्रांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 दिनांक १७ व १८ऑगस्ट रोजी "थर्मल पॉवर स्टेशन प्लांट मधील वायू गुणवत्ता नियंत्रण प्रणाली" या विषयावर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील  तज्ञांची मार्गदर्शने झाली. या परिषदेत परळी केंद्रातील कार्यकारी रसायन शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. दिनांक १८ रोजी  दुपारच्या सत्रात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली केंद्राच्या वतीने कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ कान्होबा शंकर  तूपसागार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावर्षी मे २०२२ मध्ये ही जलव्यवस्थापन साठी दोन राष्ट्रीय पुरस्कार परळी औष्णिक विद्युत केंद्राला मिळाले आहेत. 

मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के एस तूपसागर आणि जलप्रक्रिया व पर्यावरण विभागातील अधिकारी, कर्माचारी यांच्या अथक परिश्रमाने हे यश मिळाले आहे .           या यशाबद्दल परळी औष्णिक विद्युत     केंद्रातील,अधिकारी,कर्मचारी, कामगार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार