*अखेरच्या श्रावणी  सोमवार निमित्त परळीत अलोट गर्दी !* 


● _देशभरातील शिवभक्तांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन_

परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ......

             देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत आज अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्तदर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. देशभरातील विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. काल (दि.२१) रविवारपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.  दर्शन रांगांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले.

         पवित्र  श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत आज दि. २२ रोजी अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल   झालेआहेत. कालपासूनच भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळत होती . मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला.  वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी पोलिसांनी ही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.  

Click &Read:● *श्रावण पर्व: महाराष्ट्र टुरिझमच्या पेजवर झळकला ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचा माहितीपट*

       धर्मदर्शन रांगेत कालपासूनच भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती  तर सकाळी यामध्ये मोठी वाढ  झाली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. मोठ्या संख्येने भाविक होणार दाखल होणे अपेक्षित धरून श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली आहे.प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी साधारणपणे दीड लाख भाविक भक्तांनी दर्शन घेतल्याचे वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी  सांगितले आहे.


Click &Read:● *.......म्हणून परळीच्या या आजींचा झाला आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरून सन्मान*

@@@

*मंदिर परिसरात बेल-फुलांच्या दुकानावर गर्दी*

      महादेवाला बेल अधिक आवडत असल्याने आज बेल-फुलांना प्रचंड मागणी होती. वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बेलाची पाने घेऊन विकण्यासाठी महिला, मुले, मुली आणि पुरुषही थांबले होते. केवळ बेल-फुलांवर हजरोंची उलाढाल झाली.

@@@@

*भक्तिमय वातावरण......!*

हर हर महादेव, बम बम बोले, वैद्यनाथ महाराज की जय, ओम नम: शिवाय या जयघोषाने भक्तांनी परिसर दणाणून सोडला होता. भाविकांच्या मांदियाळीने परळी वैद्यनाथ नगरी फुलून गेली होती. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.तसेच चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त वैद्यनाथ मंदिरात लाखो भाविक आल्याने परळीला यात्रेचे स्वरुप आले आहे. दिवसभरात परळी पंचक्रोशीतील भाविकांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात सह मराठवाड्यातील दीड लाखाहून अधिक भाविक प्रभू वैद्यनाथ चरणी नतमस्तक  झाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !