23 ऑगस्ट रोजी सिटू कामगार संघटनेचे परळीत जिल्हा अधिवेशन



जिल्हाध्यक्ष काॅ. बी.जी. खाडे यांची माहिती

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी

      बीड जिल्हा सिटू कामगार संघटनेचे जिल्हा अधिवेशन 23 ऑगस्ट रोजी परळी येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती बीड जिल्हाध्यक्ष बी.जी. खाडे यांनी दिले आहे.

          परळी येथील जाजुवाडी विठ्ठल मंदिरात दिनांक 23 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र सिटू चे अध्यक्ष कामगार नेते व बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. डी एल कराड यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनाला सिटूचे सरचिटणीस कॉम्रेड एम एम शेख, कोषाध्यक्ष के आर रघु प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात केंद्र सरकारने बदललेले कामगार कायदे, सरकारचे कामगार विरोधी धोरण, कामगारांचे प्रश्न, शेतकरी व कामगारांचा एकत्रित लढा आदी विषयावर डॉ. कराड सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. बीड जिल्ह्यात सिटू अंतर्गत काम करणाऱ्या सात कामगार संघटना असून कामगारांची सभासद संख्या 1600 आहे. कामगारांचे शंभर प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता हे अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात जिल्ह्याचे सरचिटणीस डॉ. थोरात कामकाजाचा अहवाल मांडणार आहेत. त्याचप्रमाणे या अधिवेशनात जिल्हा कार्यकारिणीची निवड होणार आहे. या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बी.जी. खाडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार