सनातन हिंदू धर्म श्रेष्ठ आहे,त्याचा सन्मान करा - प.पु.प्रदीप मिश्रा



*_सात दिवस कथा ऐकलेल्या आजींचा केला व्यासपीठावर सन्मान*


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.२१- सनातन हिंदू धर्म श्रेष्ठ आहे,त्याचा सन्मान करा असे प्रतिपादन प.पु. प्रदीपजी मिश्रा यांनी कथेच्या विश्राम दिनी केले.देशातील पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथाच्या पावन भूमीत मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिव महापुराण कथेची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.मुख्य यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यांच्या नियोजनाचे कौतुक महाराजांनी यावेळी केले.वैजनाथाची परळी नेहमी स्मरणात राहील, येथील भक्तांचा सेवा भाव मोठा आहे.माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची कथेसाठी उपस्थिती होती त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

सनातन धर्म रक्षणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.सनातन हिंदू धर्म श्रेष्ठ आहे,त्याचा सन्मान करा.गौ सेवा करा,तेहतीस कोटी देव असल्याने आपल्याला इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही.भगवंत नेहमीच मानवाच्या हृदयात निवास करतो.या कथेचा संकल्प प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने झाला आहे, वैद्यनाथाचा महिमा कितीही सांगितला तरी तो कमीच आहे.आपली बुद्धी,कार्य,मन शिवमय राहो असे आशिर्वचन आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवतभूषण प.पू.प्रदीपजी मिश्रा यांनी व्यासपीठावरून दिले.आपल्या अमोघ वाणीतून महाराजांनी सातही दिवस उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

मृत्यूपश्चात या शरीराला काही किंमत नाही म्हणून त्याला नष्ट केले जाते.शरीरात प्राण असतांनाच महादेवाचे ईश्वराचे चिंतन केले पाहिजे.भक्तांचे रक्षण करण्यासाठी महादेव मृत्यूलोकात कैलासावर निवास करतात.

महादेवाच्या अभिषेकासाठी गायीचेच दूध वापरा,गाय वाचवा धर्म वाचवा असे ते म्हणाले.आज मी इथून जात आहे,मात्र भगवान शंकर वैद्यनाथाचा आशिर्वाद नेहमी सोबत राहील.प्रशासनाने केलेल्या सहकार्य तसेच कथेसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सेवा करणाऱ्यांचे गुरुदेव प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी आभार मानले.



*शिवभक्ताचा असाही भाव,सातही दिवस आजींनी उभे राहून ऐकली कथा*

शिवमहापुराण ऐकण्यासाठी देशभरातील भाविक परळीत दाखल झाले होते.कथा मंडपात एका आजींनी सात दिवस उभे राहून शिवकथा ऐकली शिवभक्ताचा हा भाव पाहून कथाव्यास प.पु.प्रदीपजी मिश्रा भारावून गेले.त्यांनी आजींना व्यासपीठावर बोलावून पुष्पहार व श्री वैद्यनाथाची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले.कथा विश्राम दिनी कथामंडपात भाविकांनी तुडुंब गर्दी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार