.......म्हणून परळीच्या या आजींचा झाला आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरून सन्मान



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
        शिवभक्तीचा दृढ निश्चयी भाव एका आजींनी दाखवून दिला.शिवमहापुराण कथेच्या सातही दिवस एका विशिष्ट जागेवरून आजींनी उभे राहून  कथा ऐकली.शिवमहापुराण ऐकण्यासाठी देशभरातील भाविक परळीत दाखल झाले होते.

     कथा मंडपात एका आजींनी सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. या आजींनी सात दिवस उभे राहून शिवकथा ऐकली. शिवभक्ताचा हा दृढ भाव पाहून कथाव्यास प.पु.प्रदीप मिश्राही भारावून गेले. कथा समारोप प्रसंगी त्यांनी आजींना व्यासपीठावर बोलावून पुष्पहार व श्री वैद्यनाथाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला.दरम्यान या शिवमहापुराण कथेचे आस्था चैनल वरून थेट प्रसारण करण्यात येत होते. या आजीबाईंना व्यासपीठावर बोलून त्यांचा सन्मान करण्यात आला व त्याबद्दल कथावाचक प.पु. प्रदीप जी मिश्रा महाराज यांनी विशेष उल्लेख करत आजीबाईंच्या नावाचा नाम उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. शिवभक्तीची दृढता व श्रद्धा याबद्दल विशेष उद्गार काढले .त्यामुळे कथामंडपात उपस्थित तसेच जगभरात बघत असलेल्या चॅनल पाहणाऱ्या भाविकांमध्ये या आजीबाई लक्षवेधी ठरल्या. 
       ज्या आजींचा सत्कार झाला या आजीबाई नेमक्या कोण हा प्रश्न यामुळे उत्सुकतेचा बनला. या आजींचा दृढ भाव सर्वांनाच आकर्षित करून गेला.  या आजींविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या आजी परळी येथीलच रहिवासी असल्याचे समोर आले. हिरा प्रभूआप्पा रेवडकर असे आजीबाईंचे नाव असून त्या नेहमीच धार्मिक कार्यात, कथा श्रवणात, विविध भजनात अग्रेसर असतात. भक्ती मार्गात या 75 वय गाठलेल्या आजींनी दृढनिश्चयी श्रद्धा दाखवून एक प्रकारे आपल्या शारीरिक वयालाच हरवल्याचे भाव व्यक्त होत आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार