इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

 कत्तलखान्याकडे जाणार्‍या 40 गोवंशीय जनावरांची सूटका

पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

बीड ः दोन पीकअपसह एका आयशर टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरे घेऊन जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी कारवाई करत 40 जनावरांची सूटका करण्यात आली. यावेळी पाचजणांना ताब्यात घेण्यात आले.

जामखेड येथून दोन पिकअप व एका आयशर टेम्पोमध्ये बीडकडे नेली जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास हजारे यांना शनिवारी सकाळी मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा लावत चुंबळी फ ाटा येथे ही वाहने अडवली असता त्यामध्ये गोवंशीय 40 जनावरे नेली जात होती. अतिशय निर्दयीपणे या जनावरांना वाहनांमध्ये कोंडण्यात आले होते. या जनावरांची सूटका करत पोलिस पथकाने  सय्यद खलील सय्यद शौकत  (रा. मोमीनपुरा), मोमीन शफिक मोमीन इस्माईल (रा. मोहम्मदया कॉलनी पेठ बीड),  नशीर दिबंजी कुरेशी (रा. खंडेश्वरी मंदिर जवळ, पेठ बीड), मझहर सलाम कुरेशी  (रा.पाथरूड), रजाक दगडू कुरेशी (रा. मादळमोही ता.गेवराई जिल्हा बीड) यांना ताब्यात घेतले. या सर्वांनी वाहन मालक कदीरमिया अहमदमिया कुरेशी (रा. मोमीनपुरा बीड), हुमेर सत्तार कुरेशी (रा. मोमीनपुरा, बीड), अफरोज इब्राहिम कुरेशी (रा. मोमीनपुरा बीड) यांच्या सांगण्यावरून ही जनावरे कत्तलीसाठी आणली होती. या सर्वांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच तीन वाहने आणि 40 गोवंश जातीची जनावरे असे एकूण 15 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनी विलास हजारे, पोलीस नाईक शिवदास घोलप, पोलीस अमलदार किशोर गोरे, पोलीस अंमलदार विनायक कडू, पोलीस अंमलदार बालाजी बासतेवाड, चालक पोलिस अमलदार गणपत पवार यांनी केली.

--------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!