परळी तालुक्यात चंदनचोरांचा धुमाकूळ:९७ हजारांचे चंदन व दोघांना पकडले



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
     परळी तालुक्यात चंदनचोरांचा धुमाकूळ सुरुआहे. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९७ हजारांचे चंदन व दोघांना पकडले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सिरसाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.


    सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२०.०८.२०२२ रोजी १०.०० वा. मौजे वांगी गावाचे उत्तरेकडील पडीक जमिनीत यातील हाकानी बाबुराव मानपाडे रा.तिप्पानानगर, अहमदपुर व गंगाधर निवृत्ती जाधव रा.हाडुळकी ता अहमदनगर जि लातुर या दोन आरोपीतानी संगनमत करून मौजे वांगी गावाचे उत्तरेकडील पडीक जमिनीत स्वताच्या फायदयाकरिता चंदनाची झाडे तोडली.


दोन इसमांनी चंदनाची झाडे तोडुन आनून चंदनाच्या खोडापासून चंदनाचा गाभा कुन्हाडीने तासून चंदनाची तस्करी करीत आसताना  मिळुन आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत चंदनाचे झाड व गाभ्यात तासलेले ३९ किलो चंंदन गर किंमत ९७५०० रूपये व एक लोखंडी कुर्‍हाड किं. २०० रूपये असा एकूण ९७७०० रूपयांचा माल मिळुन आला. याप्रकरणी पो.ना.संतोष सूर्यान जोटेवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !