आरटीओच्या बनावट सह्या करुन गाडीची पासिंग


बीडमध्ये वरिष्ठ लिपीकासह एजंटवर गुन्हा दाखल


बीड ः दुसर्‍या जिल्ह्यात नोंदणी झालेल्या वाहनास बीड जिल्ह्याची पासिंग करुन देण्यासाठी आरटीओच्या बोगस सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात कार्यालयातीलच वरिष्ठ लिपीकासह एजंटवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बीडचे आरटीओ कार्यालय वेगवेगळ्या गैरप्रकारांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांनी एजंट सय्यद शाकेर सय्यद अहेमद याच्याशी संगनमत करत एआर 9 पी 2283 या वाहनास बीड जिल्ह्याची पासिंग देण्यासाठी यापूर्वी कार्यरत असलेले आरटीओ वैभव राऊत आणि नोंदणी प्रभारी संदिप खडसे यांच्या बोगस सह्या केल्या व या चोरीच्या वाहनास एमएच 23 बीसी 5367 ही बीड जिल्ह्याची पासिंग दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक साबळे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !