इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 

॥ वैद्यनाथ स्तुतीगान ॥


वैद्यनाथा  वैद्यनाथा 

पार्वती शिव प्रिय  वैद्यनाथा 

भस्मांकीत शिव  वैद्यनाथा 

निळकंठ धारका वैद्यनाथा 

आदीनाथा शिव वैद्यनाथा 

जटाधारी शिव वैद्यनाथा 

धन्वंतरि शिव वैद्यनाथा 

वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा॥धृ॥

नंदी वाहना वैद्यनाथा 

भवरोग हारक वैद्यनाथा 

भैरव पालका वैद्यनाथा 

तांडव नृत्य वैद्यनाथा

दुष्ट संहारक वैद्यनाथा

दुरित निवारक वैद्यनाथा

शिस्त पालक वैद्यनाथा

कष्ट निवारक वैद्यनाथा 

वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥१॥

कर्पुरवर्णा  वैद्यनाथा 

गंगा धारक वैद्यनाथा 

नरमुंड माला वैद्यनाथा 

मेरू धारक वैद्यनाथा 

गिरीजा निवासा वैद्यनाथा 

पंचमुख धारक वैद्यनाथा 

ञिशुल धारक वैद्यनाथा 

डमरू धारक वैद्यनाथा 

वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥२॥

चिलीया रक्षका वैद्यनाथा 

देवादी देवा वैद्यनाथा 

उमापती तू वैद्यनाथा 

अमृतधारी वैद्यनाथा 

हरी हरा तू  वैद्यनाथा 

भू कैलासा वैद्यनाथा 

भूजंग भूषणा वैद्यनाथा 

वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥३॥

सृष्टी काळ वैद्यनाथा 

अनाथ रक्षका वैद्यनाथा 

धरणी नायका वैद्यनाथा 

रूद्रमाळ गळा वैद्यनाथा 

डमरू वादका वैद्यनाथा 

चंद्र धारक वैद्यनाथा 

पुज्य दैवत वैद्यनाथा 

वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥४॥

प्रसन्न मुर्ती वैद्यनाथा 

अभय हस्ता वैद्यनाथा 

पंचम स्थान वैद्यनाथा 

अक्षय वरदा वैद्यनाथा

हरी हर तिर्थ वैद्यनाथा 

मार्केड्येंय तारक वैद्यनाथा 

वेणूमती उध्दारक वैद्यनाथा 

चक्र तीर्थ वैद्यनाथा 

वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥५॥

शाळीग्राम लिंग वैद्यनाथा 

शतनाम धारक वैद्यनाथा 

सती वल्लभा शिव वैद्यनाथा 

वैजयंती नगर वैद्यनाथा 

कस्तुरी तिलक वैद्यनाथा 

कालराञी प्रिया वैद्यनाथा 

मनमोहक लिंग वैद्यनाथा 

प्रत्यक्ष देव वैद्यनाथा 

वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥६॥

दुग्ध प्रिय शिव वैद्यनाथा 

बेलपञ प्रिय वैद्यनाथा 

नित्य दर्शन वैद्यनाथा 

भस्मासूर भस्म वैद्यनाथा 

ञिकाल दर्शन वैद्यनाथा 

प्रदोष काळ वैद्यनाथा 

काशी दर्शन वैद्यनाथा 

भू कैलासा  वैद्यनाथा 

वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥७॥

** रचना आणि संकल्पना **

गोपाळ रावसाहेब आंधळे 

परळी वैद्यनाथ, जि.बीड 

मोबाईल :-9325754577 

9823335439







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!