युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

संयम संपला: परळी तालुक्यातील या गावात झालं अनोखं आंदोलन



परळी (प्रतिनिधी)

परळी तालुक्यातील मौजे रेवली येथे गाव रस्त्यासाठी नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. याच पाण्यात बसून ग्रामस्थांनी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.


शनिवारी सकाळी मौजे रेवली येथील नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्यावर घाण पाण्यात बसत आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून गावात येणारा मुख्य रस्ता करावा अशी मागणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. याबद्दल सतत पाठपुरावा केला, मात्र अद्यापही रस्त्याच्या प्रश्नाला प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले नाही. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाल्याने चिडलेल्या नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. येत्या आठ दिवसांत रस्ता न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या