MB NEWS-परळी शिवसेनेतही वाटणी: शिंदेसेेनेत शिवाजीराव शिंदेअनेक कार्यकर्त्यांसह दाखल

परळी शिवसेनेतही वाटणी: शिंदेसेेनेत शिवाजीराव शिंदे अनेक कार्यकर्त्यांसह दाखल 



परळी वैजनाथ दि. 

       अखेर परळी वैजनाथ तालुक्यातही ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते, प्रमुख वक्ते शिवाजीराव शिंदे यांनी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे सेना वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले. 

        राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्या तरी परळी तालुक्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना मजबूत असल्याचे दिसत होते. मात्र अखेर इथेही ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे व्यासपीठ गाजवणारे प्रमुख वक्ते आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या उपस्थितीत बीड येथे शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. 

        जेष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांच्यासह युवा सेनेचे विधानसभा प्रमुख बाबा सोनवणे, शिवसेना सचिव रामराव माने, सिरसाळा सर्कल प्रमुख विश्वनाथ राठोड, सिरसाळा शहर प्रमुख कैलास कावरे, दत्ता महाराज सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

      आपण शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम केले मात्र राज्यात सत्ता असुनही कार्यकर्त्यांना काहीच फायदा झाला नाही उलट कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले. एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतल्याने निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळू शकतो आपण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार