परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 राज्यपालांचे परळीत जोरदार स्वागत : आज मुक्काम; उद्या सकाळी जाणार गोपीनाथगडावर

*कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादात राज्यपालांनी दिला मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा !*

*राज्यपाल उद्या गोपीनाथ गडावर जाणार*

परळी ।दिनांक १९।

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज शहरात आगमन झाले. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधतांना त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.


   राज्यपाल कोश्यारी यांचे दुपारी ३.४५ वा. शहरात आगमन झाले. श्रावण महिन्यानिमित्त वैद्यनाथ मंदिरात जाऊन त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचेसह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.


  दर्शनानंतर राज्यपाल कोश्यारी यांचे चेमरी विश्रामगृह येथे आगमन झाले, याठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, वैजनाथ जगतकर, संदीप लाहोटी, नगरसेविका उमाताई समशेट्टे, डाॅ. शालिनी कराड, महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस जयश्री मुंडे, शहराध्यक्षा सुचिता पोखरकर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 


*उद्या गोपीनाथ गडावर* 

------------

राज्यपालांनी कार्यकर्त्यांच्या भेटीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे साहेब माझे खूप चांगले मित्र होते, आम्ही एकत्र काम केले आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजाताई मुंडे काम करत असल्याचे ते म्हणाले . उद्या सकाळी गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!