पं .यादवराज फड यांची परळी येथे मैफिल
परळी - विठ्ठल रुक्मिणी आणि संत सेना महाराज यांच्या मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त किराणा घराण्याचे प्रख्यात गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं. यादवराज फड यांच्या गायनाची बहारदार मैफिल सोमवार दि. 22आॅगस्ट रोजी रात्री 8 वा. समता नगर येथे आयोजित केली आहे.
अभंगवाणीच्या या कार्यक्रमात ते संत सेना महाराजांच्या रचना आवर्जून सादर करणार आहेत. त्याना तबला शेखर दरवडे, हार्मोनियम मकरंद खरवंडीकर टाळ - आनंद टाकळकर, गायन साथ सुनील पासलकर हे कलाकार साथसंगत करतील, या सुवर्ण संधीचा संगीत प्रेमी रसिकांनी आवश्य लाभ घ्यावा असे नाभीक महामंडळ,समतानगर मित्र मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
--------------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा