MB NEWS-मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान

 महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी राज्यपालांना परळीतील युवकांकडूनअनोखी भेट 

 मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      आपल्या विविध वक्तव्यांनी वाद ओढवून घेणारे व महाराष्ट्राबद्दल आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र अस्मितेची जाणीव नसल्याच्या टिकेचे धनी ठललेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे परळीत आले असतांना त्यांना महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी भेटवस्तू काही युवकांनी दिली.एकप्रकारे ही भेट सकारात्मकता जपत खोचक अशी अनोखी भेट ठरली आहे.

           वैभवशाली महाराष्ट्रातील गौरवशाली मराठवाड्याची उन्नत परंपरा दर्शवणारी छायाचित्र प्रतिमा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना काही युवकांनी भेट दिली. राज्यपाल भगतसिंग कोशियारी आज देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथाच्या दर्शनाला आले होते.  अनेकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे व सहकारी युवकांनी राज्यपालांंची भेट घेतली.जाणीवपूर्वक महाराष्ट्र अस्मितेची जाणीव करुन देणारी  व महाराष्ट्राबद्दल आभिमान बाळगा असा अप्रत्यक्ष संदेश देणारी छायाचित्र प्रतिमा देत त्यांनी अनोख्या पद्धतीने राज्यपाल यांचे स्वागत केले. 

      मराठवाडय़ातील तीन ज्योतिर्लिंग, शिख धर्माचे प्रेरणास्थान संत नामदेव यांचं जन्मस्थळ असलेलं नर्सी, साडेतीन शक्तीपीठापैकी एक तुळजाभवानी मंदीर, संत जनाबाईंची जन्मभुमी गंगाखेड, संत एकनाथांची जन्मभुमी पैठण, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालय, परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, ऐतिहासिक वारसा असणारा दौलताबाद येथील देवगिरी किल्ला,शिक्षणाचे व क्रांतीचं केंद्र असणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,बीबी का मकबरा( छोटा ताजमहाल),प्रसिद्ध व पुरातन अजिंठा वेरूळ येथील बुद्ध लेण्या, गुरूद्वारा नांदेड, आद्यकवी मुकुंदराज व ऐतिहासिक हत्ती खाना, आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रामीण  रूग्णालय अंबाजोगाई, स्टील इंडस्ट्रीज, जालना, विष्णुपुरी प्रकल्प, जायकवाडी, नाथसागर, सिना कोळेगाव धरण, उर्जाकेंद्र परळी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थी असणारी चैत्यभूमी पानगाव, संत भगवान बाबांची कर्मभुमी  अशा धार्मिक, ऐतिहासिक, संतांची भुमी असणाऱ्या वैभवशाली महाराष्ट्रातील गौरवशाली मराठवाड्याची उन्नत परंपरा दर्शवणारी छायाचित्र प्रतिमा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेट देण्यात आली. यावेळी अनंत इंगळे,जयराम गोंडे आदींसह युवक उपस्थित होते.

        दरम्यान समृद्ध व ऐतिहासिक वारसा असणाऱ्या मराठवाड्याची प्रतिमा राज्यपाल यांना भेट देण्याचा योग  परळीमध्येच आला. याप्रसंगी  ही छायाचित्र प्रतिमा जाणीवपूर्वक भेट दिली असुन राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राचा अभिमान बाळगावा असा संदेश या माध्यमातून त्यांना देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे अनंत इंगळे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !