*आ.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते रविवारी हनुमान नगर येथील श्री.कृष्णमुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलाशारोहण सोहळा*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

        शहरातील हनुमान नगर, डोंगर तुकाई रोड भागात उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते हा सोहळा होणार आहे.

             श्री कृष्ण मंदिर, श्रीकृष्ण चौक, हनुमान नगर, डोंगरतुकाई रोड, परळी वैजनाथ येथे रविवार दि. २१/८/२०२२ रोजी श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला गुरु कांंच बसवेश्वर मठ संस्थान, पाथरीचे श्री.ष.ब्र.१०८ गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज, श्री. ह. भ. प. गणेश महाराज जाधव परतुरकर, ह. भ. प. श्री. विठ्ठल महाराज उखळीकर, श्री.ह.भ.प. शिवहरी महाराज भाकरे कृष्ण नगर, अंबलवाडी यांचे आशिर्वचन लाभणार आहेत.पुजा विधी पौरोहित्य श्री. उमाकांत स्वामी हे करणार आहेत. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून न. प.. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे,अनिल आष्टेकर, प्रा. भालचंद्र हुच्चे उस्मानाबाद,नारायणराव गवळी सांगली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष रा. कॉ. परळी वै.शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी असुन श्री कृष्णमुर्ती प्राण प्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा समितीचे अध्यक्ष वैजनाथराव बागवाले हे आहेत. तर कार्यवाहक ह.भ.प.श्री.बळीराम महाराज हे आहेत.

          दि. २१/८/२०२२ रोजी सकाळी ७ वा. पासून धार्मिक विधी, सकाळी १० वा. मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा दुपारी १२ ते २ आशिर्वचन व नंतर महाप्रसाद होईल. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त गवळी समाज, परळी वैजनाथ. यांच्यावतिने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !