महाराष्ट्र टुरिझमच्या पेजवर झळकला ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची माहितीपट

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिर चा माहितीपट राज्य शासनाची संस्था असलेल्या महाराष्ट्र टुरिझमच्या पेजवर झळकला आहे. विनाकारण ज्योतिर्लिंग स्थानाबाबत तथाकथित संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र टुरिझम ने बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग स्थान म्हणून प्रदर्शित केलेला हा माहितीपट या अर्थाने विशेष महत्त्वाचा आहे.

Click&Read:*अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्त परळीत अलोट गर्दी !* ● _देशभरातील शिवभक्तांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन_

       सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. या निमित्ताने गेल्या महिनाभरात पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक परळीत दाखल झाले व मनोभावे वैद्यनाथाचे दर्शन घेतले. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे धर्मशास्त्र संमत व अधिकृत ज्योतिर्लिंग स्थान आहे. मात्र काही ठिकाणी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थानाबाबत संभ्रम निर्माण करून केंद्र सरकारच्या योजना व निधी खेचून घेण्यासाठी अन्यत्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्र असल्याचे निरर्थक दावे केले जात आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र टुरिझम वर महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे, पर्यटन स्थळे, धार्मिक महत्त्व असलेली स्थळे आदीबाबतची माहिती प्रसारित केली जाते. यामध्ये आज चौथ्या सोमवारी परळी वैजनाथ मंदिरचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्र टुरिझमच्या या पेजला लाखोंची दर्शक संख्या असते. तसेच पर्यटकांना व यात्रेकरूंना मार्गदर्शक म्हणून प्रत्येक राज्यातील टुरिझम काम करते. महत्त्वपूर्ण अशा या संस्थेच्या पेजवर परळी वैजनाथ चा माहितीपट आज प्रदर्शित झाला आहे.

ही आहे पेजची लिंक............

https://www.facebook.com/100064740034789/posts/pfbid02nBiU7rmWLhjgf11RzmpifUmxzxf6TzExrArKyvVNxcREkcnfFghFGtNnsWjnzoBsl/?mibextid=kn6ZUx

Video 


● चौथा श्रावण सोमवार: वैद्यनाथ मंदिर पुष्पमाला आणि विद्युत रोषणाईने नटले.👇👇👇👇👇




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार