युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 घ्या आता.....चक्क पोलीस कॉलनीत- पोलीस कॉर्टर समोर -हँडल लॉक केलेल्या मोटरसायकलवर चोरट्यांचा डल्ला



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

          परळी शहर व तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. काही केल्याने चोरांचे  डल्लासत्र थांबता थांबत नाही. दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्यांच्या घटना घडताना दिसत आहेत. चोरीच्या  या सत्रांमधून कोणताही स्तर सुटलेला नाही. आता तर चक्क चोरट्यांनी पोलीस कॉलनीतच डल्ला मारला आहे. पोलीस कॉलनीत एका पोलीस क्वार्टर समोर हँडल लॉक करून लावलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्याने पळविल्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

               याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 20 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत परळीच्या पोलीस क्वार्टर समोर फिर्यादी बळीराम प्रभाकर कसबे रा. पोलीस कॉलनी यांची 35 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस हिरो होंडा मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून चोरून नेली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास पो.ना. कांदे हे करत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या