इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 अहंकार मानवाच्या पतनाचे कारण - प.पु. प्रदीप मिश्रा

उद्या होणार कथेची सांगता🔸


परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२० - अहंकार  मानवाच्या पतनाचे कारण बनतो, म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार होऊ देऊ नका असे प्रतिपदान प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी सहाव्या दिवशीच्या कथेत केले.येथील मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेत त्यांनी शिवमहिमा वर्णीत केला.कथेचे श्रवण करण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या मराठी भजनावर भाविकांनी ठेका धरला होता.

           कर्ता करविता भगवान शंकर आहेत,सर्व सृष्टी त्याच्या आधीन आहे.म्हणून शिव निंदा करू नये.भगवान शंकराला आपल्या जीवनात आलेले दुःख सांगा त्यापासून ते मुक्त करतात.मानवाच्या अहंकाराचे हरण फक्त भगवंतच  करू शकतो.भगवंताची केलेली सेवा फळ देतेच म्हणून आपण देवाची नित्य सेवा केली पाहिजे.कणा कणांत शंकर आहे असे महाराजांनी कथेचे विवेचन करतांना सांगितले.

     शिव निंदा केल्याने शापित झालेल्याम हर्षी नारदांनी चंद्रभागे तिरी व्रत करत स्वतःला शाप मुक्त करून घेतले होते.भगवान शंकर,विष्णूंचे वरदान म्हणजे पंढरपूर येथील चंद्रभागा नदी आहे.सगळ्या नद्या येथे दर्शनाला येतात,विविध नद्यांचे स्नानाच्या पुण्य एकटया चंद्रभागेच्या स्नानाने मिळते.म्हणून भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाआधी चंद्रभागेत स्नान करतात.असे सांगत पंढरपूर येथील चांद्रभागेची महती सांगितली. 

🔸आज होणार कथेची सांगता🔸

           आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून गेले सात दिवस परळीकरांनी अभिषेक शिव महापुराण कथा श्रवण केली.आज रविवार दि.२१ रोजी या शिवमहापुराण कथेची सांगता होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!