पोस्ट्स

MB NEWS- *भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर*

इमेज
 भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहेत फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या आवडत्या मायबोली या लोकप्रिय मराठी वाहिनीवरून येत्या रविवार पासून सलग तीन दिवस  दि 21 22 आणि 23 मार्च 2021 पर्यंत. थोर किर्तनकार वै. रामेश्वर महाराज गुट्टे परळी वै. यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने राज्यस्तरीय भव्य किर्तन महोत्सव परळी-वैद्यनाथ येथील अखंड हरिनाम सप्ताहातील पाचवे किर्तन पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे यांच्या सुमधूर आवाजात उत्कृष्ट किर्तनसेवा जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील  आपुला तो एक देव करूनी घ्यावा या अंगावरील चिंतनीय किर्तनसेवा जिवनात सुख पाहिजे असेल तर जगात फक्त देव आपलासा करावा लागतो अशा पद्धतीने सोनवणे महाराज यांनी अतिशय मार्मिक चिंतन अभंगातून आपल्या समोर मांडले आहे तरी सर्वांनी या मायबोली वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या किर्तन रंग या मालिकेतील हे किर्तन पुष्प ऐ

MB NEWS-सर्व व्यवसायिकांनी दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाई किंवा संपूर्ण लाॅकडाउन-जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा*

इमेज
  सर्व व्यवसायिकांनी दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाई किंवा संपूर्ण लाॅकडाउन-जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा बीड/प्रतिनिधी..........     जिल्ह्यातील सर्व व्यवसायिकांनी उद्या दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे किंवा जिल्ह्यात संपूर्ण लाॅकडाउन करावे लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.       जिल्ह्यातील सर्व व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी यांनी दिनांक ०१.०३.२०२१ रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकी मध्ये हमी दिली होती की, सर्व व्यापारी १५ मार्च २०२१ पर्यंत अॅन्टीजेन/आरटीपीसीआर टेस्ट करून घेतील, १५ मार्च २०२१ नंतर जो व्यापारी अॅन्टीजन/आरटीपीसीआर टेस्ट न करता आपला व्यवसाय सुरु करेल त्यावर फौजदारी तसेच दंडात्मक कार्यवाही अनुसरावी. तसेच रेस्टॉरंट,बार, भाजीपाला- फळ विक्रेते यांचे प्रतिनीधी यांनी प्रत्यक्ष भेट घेवून सर्व नियम पाळूनच व्यवसाय केले जातील लागू केलेले निर्बध शिथिल करण्यात यावेत अशी विनंती केली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली. परंतु प्रशासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, जिल

MB NEWS-बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार - पंकजाताई मुंडे

इमेज
बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार - पंकजाताई मुंडे *_कोरम पूर्ण होण्याएवढे उमेदवारच होणार नाहीत ; सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव_* बीड । दिनांक १९। बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने उद्याच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले. तथापि कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असे सांगून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचे त्या म्हणाल्या.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आज सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जे काही प्रकार घडले ते जिल्हयाने पाहिले आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. आम्ही पाच वर्षात बँकेत शेतकऱ

MB NEWS-शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे

इमेज
शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे परळी /प्रतिनिधी महावितरण कंपनीकडून सध्या शहरी आणि ग्रामीण भागात वीज तोडणी मोहीम राबविण्यात येत आहे वाण प्रकल्पावरील तसेच शेतातील कृषिपंपांची वीज तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा  प्रा. टी. पी.मुंडे (सर) यांनी दिला आहे.    मांडेखेल येथे वाण प्रकल्प व परिसरातील सर्व शेतकरी यांची बैठक  प्रा.टी. पी.मुंडे (सर)यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे आणि नागापूर सर्कलचे जि. प.सदस्य प्रदीप मुंडे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले होते तसेच राज्याचे ऊर्जामंत्री यांनीसुद्धा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे सांगितले होते आणि 100 युनिट पर्यंत विज बिल माफ करू असा निर्णय सरकारने घेतला परंतु यापैकी एकही निर्णय सरकारने पाळला नाही. शेतकरी' शेतमजू

MB NEWS-अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला फेलोशिपचा मान

इमेज
  अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला फेलोशिपचा मान परळी/प्रतिनिधी.... इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्सतर्फे देण्यात येणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) परीक्षेत परळीचा युवक अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला राष्ट्रीय पातळीवरील श्रेणी प्राप्त करून फेलोशिप मिळाली आहे. अमेय लातूरमधील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. तर परळीतील प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांचा मुलगा, निवृत्त ज्येष्ठ अधिष्ठाता (डीन) डॉ. जे. जे. देशपांडे यांचा नातू आहे. या यशाबद्दल अमेयचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

MB NEWS -परळीतील विजपुरवठा सुरळीत करा व सक्तीची वसुली थांबवा-भाजयुमोची निवेदनाद्वारे मागणी

इमेज
  परळीतील विजपुरवठा सुरळीत करा व सक्तीची वसुली थांबवा-भाजयुमोची निवेदनाद्वारे मागणी  परळी वैजनाथ /प्रतिनिधी...         गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरात विजेचा लपंडाव सुरू असून ऐन उन्हाळ्यात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वसुलीला सामोरे जावे लागत आहे.वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारीचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.         याबाबत परळी वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता आंबडकर व देशमुख मॅडम यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरातील नागरिक विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. या तक्रारींचा निपटारा अद्याप झालेला नाही. त्यातच सक्तीची वसुली केली जात आहे. उन्हाळ्यात नागरिकांना विजेच्या

MB NEWS-*प्राचार्या अर्चना नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत मिळवले यश*

इमेज
*प्राचार्या अर्चना नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत मिळवले यश* परळी वै... _प्रतिनिधी_        प्राचार्या अर्चना दिंगबरराव नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत यश यांनी  संपादण केले आहे.मधुकर गित्ते यांच्या सौभाग्यवती त्या परळी येथील यशवंतराव चव्हाण या महाविद्यालयत प्राचर्या  या पदावर कार्यरत असुन सौ.अर्चना यांच्या या उज्वल यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येवुन पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा देण्यात येत आहेत..

MB NEWS-डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे शेमारु मराठीबाणा वाहिनीवर कीर्तन

इमेज
  डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे शेमारु मराठीबाणा वाहिनीवर कीर्तन बीड : प्रतिनिधी संत साहित्याचे अभ्यासक तथा युवा प्रचारक स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांचे नामाचा महिमा विशद करणारे हरिकीर्तन दि. १९ व २० मार्च रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत आनंदवारी... उत्सव कीर्तनाचा या कीर्तनमालिकेत प्रक्षेपित होणार आहे. श्री संत मीराबाई आईसाहेब यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त संत मीराबाई संस्थान, पाटोदा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाचे पुष्प गुंफताना गुट्टे महाराजांनी संत एकनाथांच्या ‘आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी आहे सर्व’ या अभंगावर निरूपण केले होते. नामाचा व संतांचा महिमा विशद करणाऱ्या या कीर्तनाचे ‘शेमारु मराठीबाणा’ या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील आनंदवारी... उत्सव कीर्तनाचा या कीर्तनमालिकेत दि.१९ व २० रोजी सकाळी ८ वाजता प्रक्षेपण तर दि.२० व २१ रोजी सकाळी ७ वाजता पुन;प्रक्षेपन होणार आहे. या कीर्तनाचा भाविकांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संत मीराबाई आईसाहेब संस्थान, प्रमोदजी रणनवरे व संतोषजी साखरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

MB NEWS-परळी येथील जेष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार ‘दर्पणरत्न’ पुरस्कार जाहीर

इमेज
  परळी येथील जेष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार ‘दर्पणरत्न’ पुरस्कार जाहीर --------------------------------------------------------------------------- परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणीवान गौरव महासंमेलन एप्रिलमध्ये पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनामध्ये परळी येथील गेली 30 वर्षापासून आपल्या पत्रकारितेचा वेगळा ठसा उमटवणारे परळी समाचारचे संपादक आत्मलिंग प्रभुअप्पा शेटे यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार” देण्यात येणार असल्याचे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अ‍ॅड. कृष्णाजी जगदाळे यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे. त्यांनी पत्रकात सांगितले की, डिसेंबर 2020 मध्येच सर्वस्तरातील नामांकित व्यक्तींना मोठ्या समारंभामध्ये हा पुरस्कार देण्याचे ठरले होते. परंतु कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारामुळे हा भव्य असा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून एप्रिमध्ये शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन हा पुरस्कार सोहळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रात सांगितले आहे. तसेच परळी समाचारचे संपादक

MB NEWS-परळीत थकबाकी व परमिटच्या नावाखाली विजेचा सारखा लपंडाव ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीने ग्राहकांना धरले वेठीस

इमेज
  परळीत थकबाकी व परमिटच्या नावाखाली विजेचा रोजच सारखा लपंडाव ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीने ग्राहकांना धरले वेठीस परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला असून विज ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. विज वितरण कंपनी दिवसभरात किती वेळेस लाईट घालवते याचे काही वेळापत्रक राहिलेले नाही. थकबाकीदार ग्राहकांची लाईट कट करण्यासाठी दिवसात 20-25 वेळा लाईट बंद करण्यात येत आहे. विज वितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली परमिट घेवून विज कट करतात पण विज कट करण्याचे वेळापत्रक काही केलेले नाही. विज कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक वैतागले गेले आहेत. वितरण कंपनीने विज घालवण्याचे वेळापत्रक तयार करून ग्राहकांसाठी ते वृत्तपत्रात छापली पाहिजे. वितरण कंपनी कार्यालयात एखाद्या ग्राहकाने फोन केला तर तेथील कर्मचार्‍यांना लाईट पुरवठा सुरू आहे कि नाही हे माहिती नसते हे विशेष.

MB NEWS-परळीच्या वैद्यकीय क्षेत्राचा सन्मान;राष्ट्रीय स्तरावरील "वैभवशालिनी" दोन पुरस्कार ! डॉ.शालिनीताई कराड यांचा दोन राष्ट्रीय पुरस्काराने दिल्लीत गौरव

इमेज
  परळीच्या वैद्यकीय क्षेत्राचा सन्मान;राष्ट्रीय स्तरावरील "वैभवशालिनी" दोन पुरस्कार ! डॉ.शालिनीताई कराड यांचा दोन राष्ट्रीय पुरस्काराने दिल्लीत गौरव  परळी l प्रतिनिधी दिल्ली येथे आयोजित आत्मनिर्भर महिला, आत्मनिर्भर भारत परिषदेत डॉ.शालिनीताई कराड यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. नॅशनल एक्सलन्स अवार्ड व राष्ट्रीय आरोग्य रत्न हे दोन पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मा दादा इधाते तसेच केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले, राज्यसभा सदस्य खा.डॉ.भागवतराव कराड यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात सोमवार, दि.15 मार्च रोजी हा नेत्रदीपक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.  किशोरवयीन मुलींचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, सुरक्षितता, शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय दर्जा  उंचावण्यासाठी केलेल्या अनेक कामांची दखल घेऊन डॉ.शालिनीताई कराड यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. याबद्दल भावना व्यक्त करतांना डॉ.शालिनीताई म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहुन लोकोपयोगी कामे करण्यासाठी माझ

MB NEWS-परळीचा चि.आरव गित्ते देशातून पहिल्या दहा विद्यार्थ्यांत

इमेज
  परळीचा चि.आरव गित्ते देशातून पहिल्या दहा विद्यार्थ्यांत  परळी l प्रतिनिधी लिडो टॉप आचिवर्स या स्पर्धेच्या अंतर्गत संपूर्ण देशातून पहिल्या दहापैकी एक येण्याचा बहुमान परळीच्या चि. आरव मधुकर गित्ते याने मिळवला आहे. या स्पर्धेत एका वेबसाईटवर कोडिंगद्वारे अँप बनवायचे असते. याच्या एकूण एक स्टेप या विद्यार्थ्याने पूर्ण केल्या आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परळीच्या चि. आरव गित्ते याने एका विशेष स्पर्धेत सरोच्च यश प्राप्त केले आहे. असे करणारा तो बीड जिल्ह्यातील प्रथम आणि देशातील पहिल्या दहापैकी एक विद्यार्थी आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून कोडिंग करून अँप बनवण्याची ही स्पर्धा असते. यापुढे आता त्याची देशातील 1 टक्के शिक्षक जे की तज्ज्ञ आणि हुशार आहेत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळणार आहे. या स्पर्धेच्या अंतर्गत असणाऱ्या एकूण 5 स्टेप पूर्ण करून त्याने पाचही प्रमाणपत्र मिळवले आहेत. यामुळे तो आता यंग लीडर बनला असून, त्याच्या वयोगटात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमधून पहिल्या दहा पैकी एक येण्याचा बहुमान मिळाला आहे. चि. आरव गित्ते याने मिळवलेल्य

MB NEWS-राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविल्याबद्दल मंजुश्री घोणेचा सत्कार

इमेज
  प्रत्येक पुरुषाने महिलांचा सन्मान करणे गरजेचे : अॅड. शुभांगी गीते  कामगार कल्याण केंद्राच्या ऑनलाईन परिसंवादाला मोठा प्रतिसाद  राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविल्याबद्दल मंजुश्री घोणेचा सत्कार परळी : (प्रतिनिधी)  भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक भारतीय पुरुषाने महिलांचा मान-सन्मान ठेवणे गरजेचे आहे. महिलांना गौरवपूर्ण वागणूक देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अॅड. शुभांगी गिते यांनी केले.  येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री-भ्रूण हत्या व महिला सशक्तिकरण या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. शुभांगी गीते बोलत होत्या.   व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार जी. एस सौंदळे, राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या मंजुश्री घोणे, शोभना सौंदळे, केंद्र संचालक आरेफ शेख उपस्थित होते.  पुढे बोलताना अॅड. गीते म्हणाल्या महिलांनी लिंग निदान चाचण्या करू नये. मुलगी असो किंवा मुलगा त्याला जन्म द्या. मुलींना वाढवा त्यांना उच्चशिक्षण द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जी. एस. सौंदळे म्हणाले, महिलांमध्ये जिद्द व चिकाटी असते. त्यांच्या

MB NEWS-रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यु

इमेज
  रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यु  परळी (प्रतिनीधी)  परळी ते गंगाखेड रेल्वे मार्गावर एका अज्ञात व्यक्तीचा रेल्वेखाली आल्याने मृत्यु झाल्याची घटना दि.7 मार्च रोजी घडली असुन ओळख पटविण्याचे काम परळी ग्रामीण पोलिस करत आहेत.  परळी -गंगाखेड रेल्वे मार्गावर दि.7 मार्च रोजी रेल्वेखाली आल्याने 30 ते 35 वयाच्या परुषाचा मृतदेह आढळुन आला होता.काळा रंग,उंची 5 फुट,पायात चप्पल अशा वर्णनाचा इसम असुन याबाबत कुणास माहिती असल्यास परळी ग्रामीण पोलिस ठाणे फोन 02446 222236,मो.9420666668 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतिने करण्यात आले आहे.

MB NEWS-कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार गायिका स्वरलक्ष्मी लहाने यांना जाहीर...

इमेज
  कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार गायिका स्वरलक्ष्मी लहाने यांना जाहीर... परभणी, दि. 8 (प्रतिनिधी) ः जागतिक महिलादिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा कर्तृत्ववान महिलांचा ""कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार ""2021"'संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रसिद्ध गायिका लक्ष्मी लहाने परभणी यांना जाहीर झाला आहे. नांदेड येथील मिमांसा फाऊंडेशन, समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुप यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यासह देशभरातील कर्तृत्ववान महिलांचा कुसूमताई चव्हाण महिला भूषण व सामाजिक पुरस्कार देऊन गौरव होत आला आहे. यावर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना हे पुरस्कार जाहीर केल्या गेले. त्यात परभणीच्या गायिका स्वरलक्ष्मी लहाने यांना संयोजन समितीने हा पुरस्कार जाहीर केला आहे.गेल्या वीस वर्षांपासून, संगीत क्षेत्रात स्वतःला वाहून घेणाऱ्या,, आणि अनेक राज्यात परभणीचे नावलौकिक करणाऱ्या,, आणि अतिशय खडतर प्रवासावर मात करत,,संगीत क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवनाऱ्या गायिका स्वरलक्ष्मी लहाने आहेत,, या व्यतिरीक्त सौ

MB NEWS-महाराष्ट्र विद्यालय मोहा चा सुत्य उपक्रम कोविड 19 लसीकरण व जनजागृती अभियान

इमेज
  महाराष्ट्र विद्यालय मोहा चा सुत्य उपक्रम  कोविड 19 लसीकरण व जनजागृती अभियान परळी वै:दि 10 प्रतिनिधी महाराष्ट्र विद्यालय मोहा च्या विज्ञान विभागाच्या वतीने ग्रामीण भागात कोविड 19 ( कोरोना ) या आजाराची जनजागृती करण्याकरिता राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य " मी माझा व कुटुंबाचा रक्षक " या मोहिमेची सुरुवात बुधवार दि 10 रोजी करण्यात आली.या कार्यक्रमास संस्थेचे जेष्ठ संचालक कॉ.सुदाम शिंदे प्रमुख उपस्थिती मोहा पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ.रेखाताई शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.चंद्रशेखर साखरे,पर्यवेक्षक श्री .सुभाष हरदास,विज्ञान विभाग प्रमुख श्री.मुकुंद चौधरी आदी सह शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सौ.शिंदे यांनी शाळेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या जनजागृती अभियास शुभेच्छा देऊन शाळेचे व विज्ञान विषय शिक्षकांचे अभिनंदन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ.शिंदे यांनी या कोरोना काळात ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर,गोरगरीब नागरिकांमध्ये या आजाराची जनजागृती करने अत्यावश्यक असल्याचे सांगून शाळेच्या वतीने राबविण्यात येणा-या या अभियानाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्र

MB NEWS-पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर*

इमेज
  पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर   वाराणसी........        प्रसिद्ध वेदाचार्य पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.संपुर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलपती राजाराम शुक्ल अध्यक्ष असलेल्या निवड समितीने ही निवड केली आहे.       वेद-वेदांग शास्त्र मर्मज्ञ राष्ट्रीय पंडित पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम पं.गणेश्वर शास्त्री द्रविड संपूर्ण भारतात व विदेशात वेदाचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत.भारतीय संस्कृतीचा पाया वेद व वेदांगाचे प्रकांड पंडित अशी त्यांची ख्याती असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी वेदांचे परिपूर्ण शिक्षण घेऊन घडले आहेत.भारतातील विद्वान वैदीकांना घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रामेश्वरम् येथील ऐतिहासिक राम सेतू च्या संरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ऐतिहासिक पुरावे समप्रमाण सादर केले.तसेच नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर शिलान्यास समारंभाचे शास्त्रीय सुक्ष्म मुहूर्त त्यांनीच काढून दिले त्याचप्रमाणे विविध विद्वाना

MB NEWS- *नगरपरिषदेने दस्तऐवजात शांतीवन बौद्ध स्मशानभूमी अशी नोंद करावी- अनंत इंगळे यांची मागणी*

इमेज
 *नगरपरिषदेने दस्तऐवजात शांतीवन बौद्ध स्मशानभूमी अशी नोंद करावी- अनंत इंगळे यांची मागणी*    परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       परळी नगर परिषद हद्दीतील बौद्ध धर्मीय स्मशानभूमीचा उल्लेख व दप्तरी नोंद हरिजन स्मशानभूमी असा आहे ती बदलून शांतीवन बौद्ध स्मशानभूमी असा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केली आहे.          याबाबत नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरिजन शब्द हा जातीवाचक व कालबाह्य आहे. नगर परिषदे च्या दप्तरी नोंद पूर्वीपासून हरिजन स्मशानभूमी  आहे. याबाबत नगरपरिषदेने ठराव घेऊन सातबारा व पी टी आर ला अधिकृतपणे शांतीवन बौद्ध स्मशानभूमी अशी सुधारणा करून घेणे आवश्यक आहे.  नगरपरिषदेने याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सरकारी दस्तऐवजात अधिकृत शांतिवन बौद्ध स्मशानभूमी अशी नोंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केली आहे.न.प.मुख्याधीकारी यांना हे निवेदन सादर करण्यात आले असुन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे, न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड, नगराध्यक्षा व तहसी

MB NEWS-परळी शहर पोलीस ठाण्यात ७८ बेवारस मोटारसायकली ; मुळ मालकांनी वाहनाची ओळख पटवून घेऊन जाव्यात पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांचे आवाहन

इमेज
  परळी शहर पोलीस ठाण्यात ७८ बेवारस  मोटारसायकली ; मुळ मालकांनी वाहनाची ओळख पटवून घेऊन जाव्यात पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांचे आवाहन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी........        पोलिस स्टेशन परळी शहर येथे बेवारस अवस्थेत अनेक दुचाकी वाहने पडून आहेत.  ज्यांची  असतील त्यांनी शहर पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून खात्री करुन आपली वाहने घेऊन जावीत असे आवाहन शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांनी केले आहे.         परळी शहर पोलीस ठाण्यात जमा असलेल्या ७८ बेवारस  मोटारसायकलीची यादी पोलीस ठाण्यातून प्रसिद्धिस देण्यात आली आहे.यादी खालील प्रमाणे आहे.

MB NEWS-पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पाच कोटी घेतल्याचा आरोप : आरोप करणा-या महिलेवर परळीत गुन्हा दाखल पुजाच्या वडिलांनी केली होती परळी पोलीसांकडे तक्रार

इमेज
 * पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पाच कोटी घेतल्याचा आरोप : आरोप करणा-या महिलेवर परळीत गुन्हा दाखल  पुजाच्या वडिलांनी केली होती परळी पोलीसांकडे तक्रार   परळी वैजनाथ: प्रतिनिधी...           पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आई वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड या महिलेने केला होता.हा आरोप बदनामीकारक व बेछुट आहे. हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांनी परळी पोलीसांकडे धाव‌ घेतली. आज दि.२ रोजी दुपारी परळी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.               पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटलेले आहे. या प्रकरणात अडचणीत सापडलेल्या शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे.या प्रकरणातील नवनव्या घडामोडी मात्र रोज सुरुच आहेत. मयत पुजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी आज दि.२ रोजी परळीत पोलीसांकडे धाव‌ घेऊन आमच्यावर पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप करणा-या शांताबाई राठोड या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पूजाचे

MB NEWS-*पुजा चव्हाण मृत्यूप्रकरण: पाच कोटी घेतल्याचा आरोप बदनामीकारक व बेछुट !* *_शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांची परळी पोलीसांकडे धाव‌_*

इमेज
  *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरण: पाच कोटी घेतल्याचा आरोप बदनामीकारक व बेछुट !*  *_शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांची परळी पोलीसांकडे धाव‌_* परळी वैजनाथ: प्रतिनिधी........        पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आई वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड या महिलेने केला होता.हा आरोप बदनामीकारक व बेछुट आहे. हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांनी आता परळी पोलीसांकडे धाव‌ घेतली आहे. आज दि.२ रोजी दुपारी परळी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.        पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटलेले आहे. या प्रकरणात अडचणीत सापडलेल्या शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे.या प्रकरणातील नवनव्या घडामोडी मात्र रोज सुरुच आहेत. मयत पुजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी आज दि.२ रोजी परळीत पोलीसांकडे धाव‌ घेऊन आमच्यावर पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप करणा-या शांताबाई राठोड या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी सांगितले की,मुख्यमंत्

MB NEWS- *स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट: अखेर 'त्या' इसमाविरुद्ध परळीत गुन्हा दाखल*

इमेज
 *स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट: अखेर 'त्या' इसमाविरुद्ध परळीत गुन्हा दाखल* *सामाजिक तेढ व शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......         स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिवशी अपमानास्पद फेसबुक वर पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील सावरकर प्रेमींनी रोष व्यक्त केला होता.याप्रकरणी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य महापुरुषांबद्दलअपमानास्पद मते ,आक्षेपार्ह टिप्पणी करुन सामाजिक शांतता भंग करणाऱ्या नरेश हालगे या  इसमाविरुद्ध आज (दि.२८) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका निवेदनाद्वारे  अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.          परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबत  गुन्हा दाखल करण्यात आला असुन भादवि कलम १५३ अ, ५०५(२) प्रमाणे आरोपी नरेश हालगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नरेश हालगे ही व्यक्ती वारंवार फेसबुक व समाज माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य हिंदुत्ववादी महापुरुषांच्

MB NEWS-स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !* *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_*

इमेज
 * स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !*  *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आज ऐन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिवशी (दि.२६) अपमानास्पद फेसबुक वर पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील सावरकर प्रेमींनी रोष व्यक्त केला. या प्रकाराचा सर्वस्तरातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य महापुरुषां बद्दल अपमानास्पद मते ,आक्षेपार्ह टिप्पणी करुन सामाजिक शांतता भंग करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले.         परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देऊन तातडीने गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. आपला रोष व्यक्त करत याप्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीसांना याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

MB NEWS-वैद्यनाथ साखर कारखान्याने केले दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याने केले  दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.       अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि अनेक अडचणींवर मात करीत कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ कारखाना चालू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हीत लक्षात घेऊन वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यात आला असुन यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दुर झाली आहे. आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता. मात्र माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर्षी कारखाना सुरू करून यशस्वीरित्या चालू केला आहे.      वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या गळीत हंगामात दिनांक 25 फेब्रुवारीपर्यंत 2 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असुन 1 लाख 75 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे तर सरासरी साखर उतारा 10. 44 टक्के असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान कारखान्याने गाळपाची यशस्वी परंप

MB NEWS-दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन मुंडे जिल्ह्यात द्वितीय

इमेज
  दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन मुंडे जिल्ह्यात द्वितीय * परळी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे निमित्य बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणीत परळी वैजनाथ येथील दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मूंडे हा द्वितीय क्रमांक मिळवून यशस्वी झाला आहे ‌. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा निवड चाचणी आहेरचिंचोली येथे घेण्यात आली. या निवड चाचणीत 74 किलो वजन गटात तिसऱ्या फेरी अंतीम कुस्ती मध्ये परळी वैजनाथ येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मुंडे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. या त्याच्या यशाबद्दल परळी येथील दयानंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री देविदास राव कावरे सर,मार्गदर्शक सुभाष नाणेकर सर,शिव शंकर कराड,प्रशिक्षक प्रा.अतुल दुबे सर प्रा.डॉ जगदीश कावरे सर यांच्या सह परळी तालुक्यातील कुस्ती प्रेमिनी अभिनंदन केले आहे.