MB NEWS-परळीचा चि.आरव गित्ते देशातून पहिल्या दहा विद्यार्थ्यांत

 परळीचा चि.आरव गित्ते देशातून पहिल्या दहा विद्यार्थ्यांत 



परळी l प्रतिनिधी

लिडो टॉप आचिवर्स या स्पर्धेच्या अंतर्गत संपूर्ण देशातून पहिल्या दहापैकी एक येण्याचा बहुमान परळीच्या चि. आरव मधुकर गित्ते याने मिळवला आहे. या स्पर्धेत एका वेबसाईटवर कोडिंगद्वारे अँप बनवायचे असते. याच्या एकूण एक स्टेप या विद्यार्थ्याने पूर्ण केल्या आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

परळीच्या चि. आरव गित्ते याने एका विशेष स्पर्धेत सरोच्च यश प्राप्त केले आहे. असे करणारा तो बीड जिल्ह्यातील प्रथम आणि देशातील पहिल्या दहापैकी एक विद्यार्थी आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून कोडिंग करून अँप बनवण्याची ही स्पर्धा असते. यापुढे आता त्याची देशातील 1 टक्के शिक्षक जे की तज्ज्ञ आणि हुशार आहेत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळणार आहे. या स्पर्धेच्या अंतर्गत असणाऱ्या एकूण 5 स्टेप पूर्ण करून त्याने पाचही प्रमाणपत्र मिळवले आहेत. यामुळे तो आता यंग लीडर बनला असून, त्याच्या वयोगटात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमधून पहिल्या दहा पैकी एक येण्याचा बहुमान मिळाला आहे. चि. आरव गित्ते याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार