इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS- *स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट: अखेर 'त्या' इसमाविरुद्ध परळीत गुन्हा दाखल*

 *स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट: अखेर 'त्या' इसमाविरुद्ध परळीत गुन्हा दाखल*




*सामाजिक तेढ व शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

        स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिवशी अपमानास्पद फेसबुक वर पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील सावरकर प्रेमींनी रोष व्यक्त केला होता.याप्रकरणी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य महापुरुषांबद्दलअपमानास्पद मते ,आक्षेपार्ह टिप्पणी करुन सामाजिक शांतता भंग करणाऱ्या नरेश हालगे या  इसमाविरुद्ध आज (दि.२८) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका निवेदनाद्वारे  अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. 

        परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबत  गुन्हा दाखल करण्यात आला असुन भादवि कलम १५३ अ, ५०५(२) प्रमाणे आरोपी नरेश हालगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नरेश हालगे ही व्यक्ती वारंवार फेसबुक व समाज माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य हिंदुत्ववादी महापुरुषांच्या संदर्भात जाणीवपूर्वक अपमानास्पद व भावना दुखावण्याच्या उद्देशाने मजकूर, छायाचित्रे प्रसारित करणे. या इसमाविरुद्ध सामाजिक शांतता भंग करणे, महापुरुषांची बदनामी करणे,भावना दुखावणे आदींसाठी कारणीभूत धरुन गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी परळीतील सावरकर प्रेमींनी पोलीसांकडे केली होती. याप्रकरणी अखेर सामाजिक तेढ व शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी नरेश हालगे या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि प्रदीप एकसिंगे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....