युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-महाराष्ट्र विद्यालय मोहा चा सुत्य उपक्रम कोविड 19 लसीकरण व जनजागृती अभियान

 महाराष्ट्र विद्यालय मोहा चा सुत्य उपक्रम



 कोविड 19 लसीकरण व जनजागृती अभियान


परळी वै:दि 10 प्रतिनिधी


महाराष्ट्र विद्यालय मोहा च्या विज्ञान विभागाच्या वतीने ग्रामीण भागात कोविड 19 ( कोरोना ) या आजाराची जनजागृती करण्याकरिता राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य " मी माझा व कुटुंबाचा रक्षक " या मोहिमेची सुरुवात बुधवार दि 10 रोजी करण्यात आली.या कार्यक्रमास संस्थेचे जेष्ठ संचालक कॉ.सुदाम शिंदे प्रमुख उपस्थिती मोहा पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ.रेखाताई शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.चंद्रशेखर साखरे,पर्यवेक्षक श्री .सुभाष हरदास,विज्ञान विभाग प्रमुख श्री.मुकुंद चौधरी आदी सह शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.



यावेळी सौ.शिंदे यांनी शाळेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या जनजागृती अभियास शुभेच्छा देऊन शाळेचे व विज्ञान विषय शिक्षकांचे अभिनंदन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ.शिंदे यांनी या कोरोना काळात ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर,गोरगरीब नागरिकांमध्ये या आजाराची जनजागृती करने अत्यावश्यक असल्याचे सांगून शाळेच्या वतीने राबविण्यात येणा-या या अभियानाचे कौतुक केले.



या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.विनायक राजमाने तर आभार व्यक्त विभाग प्रमुख श्री.मुकुंद चौधरी सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या