MB NEWS-कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार गायिका स्वरलक्ष्मी लहाने यांना जाहीर...

 कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार गायिका स्वरलक्ष्मी लहाने यांना जाहीर...




परभणी, दि. 8 (प्रतिनिधी) ः जागतिक महिलादिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा कर्तृत्ववान महिलांचा ""कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार ""2021"'संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रसिद्ध गायिका लक्ष्मी लहाने परभणी यांना जाहीर झाला आहे.

नांदेड येथील मिमांसा फाऊंडेशन, समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुप यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यासह देशभरातील कर्तृत्ववान महिलांचा कुसूमताई चव्हाण महिला भूषण व सामाजिक पुरस्कार देऊन गौरव होत आला आहे. यावर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना हे पुरस्कार जाहीर केल्या गेले. त्यात परभणीच्या गायिका स्वरलक्ष्मी लहाने यांना संयोजन समितीने हा पुरस्कार जाहीर केला आहे.गेल्या वीस वर्षांपासून, संगीत क्षेत्रात स्वतःला वाहून घेणाऱ्या,, आणि अनेक राज्यात परभणीचे नावलौकिक करणाऱ्या,, आणि अतिशय खडतर प्रवासावर मात करत,,संगीत क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवनाऱ्या गायिका स्वरलक्ष्मी लहाने आहेत,, या व्यतिरीक्त सौ. विजयालक्ष्मी देशमुख, सौ अर्चना डावरे परभणी,प्रा. क्षमा करजगावकर, डॉ. वैशाली कोडगीरे, श्रीमती मीरा भट, श्रीमती अर्चना इटकरे, सौ. लता तम्मेवार, सौ. उषा नळगिरे, रंजीता ओतारी, सविता कदम, पूजा पौळ, श्रिया मोरकुळे यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ मार्च ऐवजी तो सोहळा पुढे होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार