MB NEWS-राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविल्याबद्दल मंजुश्री घोणेचा सत्कार

 प्रत्येक पुरुषाने महिलांचा सन्मान करणे गरजेचे : अॅड. शुभांगी गीते 


कामगार कल्याण केंद्राच्या ऑनलाईन परिसंवादाला मोठा प्रतिसाद



 राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविल्याबद्दल मंजुश्री घोणेचा सत्कार


परळी : (प्रतिनिधी) 

भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक भारतीय पुरुषाने महिलांचा मान-सन्मान ठेवणे गरजेचे आहे. महिलांना गौरवपूर्ण वागणूक देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अॅड. शुभांगी गिते यांनी केले.


 येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री-भ्रूण हत्या व महिला सशक्तिकरण या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. शुभांगी गीते बोलत होत्या. 


 व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार जी. एस सौंदळे, राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या मंजुश्री घोणे, शोभना सौंदळे, केंद्र संचालक आरेफ शेख उपस्थित होते. 


पुढे बोलताना अॅड. गीते म्हणाल्या महिलांनी लिंग निदान चाचण्या करू नये. मुलगी असो किंवा मुलगा त्याला जन्म द्या. मुलींना वाढवा त्यांना उच्चशिक्षण द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी जी. एस. सौंदळे म्हणाले, महिलांमध्ये जिद्द व चिकाटी असते. त्यांच्या जिद्दीला पुरुषांनी प्रोत्साहन द्यावे.


एक दिवसाचे मुख्यमंत्री या उपक्रमांतर्गत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भुषविल्याबद्दल कामगार पाल्य मंजुश्री घोणे हिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

केंद्र संचालक आरेफ शेख यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार