MB NEWS-*पुजा चव्हाण मृत्यूप्रकरण: पाच कोटी घेतल्याचा आरोप बदनामीकारक व बेछुट !* *_शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांची परळी पोलीसांकडे धाव‌_*

 *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरण: पाच कोटी घेतल्याचा आरोप बदनामीकारक व बेछुट !* 



*_शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांची परळी पोलीसांकडे धाव‌_*


परळी वैजनाथ: प्रतिनिधी........

       पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आई वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड या महिलेने केला होता.हा आरोप बदनामीकारक व बेछुट आहे. हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांनी आता परळी पोलीसांकडे धाव‌ घेतली आहे. आज दि.२ रोजी दुपारी परळी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

       पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटलेले आहे. या प्रकरणात अडचणीत सापडलेल्या शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे.या प्रकरणातील नवनव्या घडामोडी मात्र रोज सुरुच आहेत. मयत पुजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी आज दि.२ रोजी परळीत पोलीसांकडे धाव‌ घेऊन आमच्यावर पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप करणा-या शांताबाई राठोड या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी सांगितले की,मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचे राजकारण का केले जात आहे?असा सवाल उपस्थित करुन आमच्यावर आरोप करणारी महिला शांताबाई राठोड हिचा व आमच्या कुटुंबाचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या कुटुंबाची व मयत पुजाबाबत या महिलेला कसलीच आत्मियता नाही.विनाकारण वारंवार विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या समोर येऊन या प्रकरणी बेताल वक्तव्ये करुन ती आमच्या कुटुंबाची बदनामी करीत असल्याचे लहु चव्हाण यांनी सांगितले.

       पुजाच्या मृत्यूपेक्षा आमच्या कुटुंबाची बदनामी जास्त केली जात आहे. ती बदनामी थांबवा अशी आमची मागणी केली आहे. आमचे कुटुंब मुलीच्या अकाली व दुर्दैवी मृत्युच्या दु:खात असताना आम्ही या प्रकरणात पाच कोटी रुपये घेतल्याचा बिनबुडाचा व मनाला वेदना देणारा आरोप या महिलेने केला आहे.अगोदरच दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना आमची रोज बदनामी केली जात असुन यामुळे संपूर्ण कुटुंब खचुन गेले आहे. आमच्यावर आरोप करणारी महिला शांताबाई राठोड हिच्यावर कलम ५००,५०१,५०२ भादंवि व कलम ६६(अ) माहिती व तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत पुजाचे वडील लहु चव्हाण यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !