MB NEWS- *नगरपरिषदेने दस्तऐवजात शांतीवन बौद्ध स्मशानभूमी अशी नोंद करावी- अनंत इंगळे यांची मागणी*

 *नगरपरिषदेने दस्तऐवजात शांतीवन बौद्ध स्मशानभूमी अशी नोंद करावी- अनंत इंगळे यांची मागणी*



   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... 

     परळी नगर परिषद हद्दीतील बौद्ध धर्मीय स्मशानभूमीचा उल्लेख व दप्तरी नोंद हरिजन स्मशानभूमी असा आहे ती बदलून शांतीवन बौद्ध स्मशानभूमी असा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केली आहे.

         याबाबत नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरिजन शब्द हा जातीवाचक व कालबाह्य आहे. नगर परिषदे च्या दप्तरी नोंद पूर्वीपासून हरिजन स्मशानभूमी  आहे. याबाबत नगरपरिषदेने ठराव घेऊन सातबारा व पी टी आर ला अधिकृतपणे शांतीवन बौद्ध स्मशानभूमी अशी सुधारणा करून घेणे आवश्यक आहे.  नगरपरिषदेने याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सरकारी दस्तऐवजात अधिकृत शांतिवन बौद्ध स्मशानभूमी अशी नोंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केली आहे.न.प.मुख्याधीकारी यांना हे निवेदन सादर करण्यात आले असुन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे, न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड, नगराध्यक्षा व तहसीलदार यांना माहितीस्तव प्रतिलिपी देण्यात आलले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !