इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर*

 पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर



 वाराणसी........

       प्रसिद्ध वेदाचार्य पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.संपुर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलपती राजाराम शुक्ल अध्यक्ष असलेल्या निवड समितीने ही निवड केली आहे.

      वेद-वेदांग शास्त्र मर्मज्ञ राष्ट्रीय पंडित पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम पं.गणेश्वर शास्त्री द्रविड संपूर्ण भारतात व विदेशात वेदाचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत.भारतीय संस्कृतीचा पाया वेद व वेदांगाचे प्रकांड पंडित अशी त्यांची ख्याती असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी वेदांचे परिपूर्ण शिक्षण घेऊन घडले आहेत.भारतातील विद्वान वैदीकांना घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रामेश्वरम् येथील ऐतिहासिक राम सेतू च्या संरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ऐतिहासिक पुरावे समप्रमाण सादर केले.तसेच नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर शिलान्यास समारंभाचे शास्त्रीय सुक्ष्म मुहूर्त त्यांनीच काढून दिले त्याचप्रमाणे विविध विद्वानांनी नोंदवलेल्या आक्षेपांचेही शास्त्रीय निराकरण त्यांनी करून दिले.

    भारतातील या महनिय व उच्च कोटीच्या विद्वान अशा पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त होत आहे.त्यांच्या या सन्मानासाठी सर्वस्तरातून अभिनंदन व वंदन होत आहे.

      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!