पोस्ट्स

MB NEWS-परळी मतदारसंघात पंकजाताई मुंडेंचा करिश्मा ;साठ टक्के ग्रामपंचायतीवर भाजपची सरशी

इमेज
  परळी मतदारसंघात  पंकजाताई मुंडेंचा करिश्मा ;साठ टक्के ग्रामपंचायतीवर भाजपची सरशी सिरसाळा, नागापूर, घाटनांदुर, बर्दापूरसह मोठया ग्रा.प. वर वर्चस्व ;प्रतिष्ठेची कौठळीही घेतली ताब्यात यशःश्री निवासस्थानी विजयी उमेदवारांचा गुलाल उधळून जल्लोष परळी वैजनाथ।दिनांक २०। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा करिश्मा सोसायट्यांच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळाला. मतदारसंघातील सिरसाळा, नागापूर, घाटनांदुर, बर्दापूर सह सुमारे ६० टक्के ग्रामपंचायतीवर पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सरशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेली कौठळीची ग्रामपंचायतही पंकजाताईंच्या ताब्यात आली आहे.     नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. परळी तालुक्यातील ७६ आणि मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते. परळी तालुक्यातील लिंबुटा, मांडेखेल, माळहिवरा/ गोपाळपूर आणि तळेगाव या ग्रा.पं. यापूर्वीच बिनविरोध आल्या आहेत. आज झालेल्या मतमोजणीनंतर लागेलेले निकाल लक्षात घेता पंकजाताई मुंडे यांचाच करिश्मा म

MB NEWS:नाथरा सरपंचपदी अभय मुंडे विजयी

इमेज
  नाथरा सरपंचपदी अभय मुंडे विजयी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथरा गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभय मुंडे हे विजयी झाले. दोन्ही मुंडेंचे अभय मुंडे चुलत भाऊ आहेत. अभय मुंडे यांनी दोघा बहीण-भावांचे बॅनरवर फोटो लावून प्रचार केला होता.             पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या गावात सरपंचपदासाठी चौरंगी लढत  होती.  पंकजा व धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे हे सरपंचपदाचे उमेदवार होते. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने आणि दोन अपक्ष उमेदवारांनी आव्हान दिले होते. मुंडे बहीण-भाऊ निवडणुकीच्या प्रचारात उतरले नसले तरी त्यांचे फोटो वापरून अभय मुंडे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ऐन निवडणुकीत पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांचे बॅनरवरील फोटोची चर्चा रंगली होती. अखेर या निवडणुकीत अभय मुंडे हे निवडून आले. त्यांना ६४८ मते मिळाली. सदस्यांमध्ये मात्र राष्ट्रवादीला ५ तर भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत. यामुळे ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. 

MB NEWS-ग्राम पंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी...अभिनंदन आमच्या कार्यकर्त्यांचे...- पंकजा मुंडे यांचे ट्विट

इमेज
  ग्राम पंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी...अभिनंदन आमच्या कार्यकर्त्यांचे...- पंकजा मुंडे यांचे ट्विट       ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे हळूहळू प्राथमिक कल हाती येत असून निकाल लागत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करत बीड जिल्ह्यात आमची सरशी कार्यकर्त्यांचे अभिनंदन अशा प्रकारची पोस्ट केली आहे.      ग्रामपंचायतींसाठी चुरशीने झालेल्या मतदानानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. . मंगळवारी (दि. 20) गुलाल कुणाला, याचा फैसला होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात झाली.निकाल घोषित होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करत बीड जिल्ह्यात आमची सरशी कार्यकर्त्यांचे अभिनंदन अशा प्रकारची पोस्ट केली आहे.     

MB NEWS:ग्रामपंचायत निवडणुक: पहिली फेरी : प्राथमिक हाती आलेले निकाल

इमेज
  ग्रामपंचायत निवडणुक: पहिली फेरी : प्राथमिक कल: हाती आलेले निकाल  सरपंचपदी विजयी उमेदवार  1)चांदपूर : संग्राम गित्ते विजयी 2)वाघबेट : मोहिनी अमरनाथ गित्ते विजयी 3)डिग्रस : मुठाळ कोमल अतुल विजयी 4)ब्रह्मवाडी : नवनाथ गित्ते विजयी 5)लेंडेवाडी : सुशीलाबाई भास्कर आवळे विजयी 6)कवडगाव साबळा : प्रयाग ज्ञानोबा साबळे 7)औरंगपुर : हनुमंत नागरगोजे 8)हसनाबाद, पाडोळी ग्रुप 9)ग्रामपंचायत : सोनू विनोद कराड 10)लोणारवाडी : संघमित्रा बाबासाहेब मुंडे 11)भिलेगाव : झुंबर गंगाधर कडभाने 12)सेलू पिंपळगाव : स्वाती नवनाथ गर्जे 13)आचार्य टाकळी : सीमा रामभाऊ घोडके 14)दौंडवाडी : नंदाबाई महादेव फड 15)गुट्टेवाडी : गुट्टे भागीरथी देविदास 16)कासारवाडी : उर्मिला बंडू गुट्टे 17)डाबी : लक्ष्मी संदीपान मुंडे 18)मरळवाडी : बापू बाबुराव आंधळे 19)तेलघाणा : महेश महादेव सिरसाट 20)देशमुख टाकळी : देशमुख लक्ष्मीबाई 21)तेलसमुख:- बाबुराव जेमा राठोड 22)परचुंडी : मीनाबाई गुरुलिंगअप्पा नावंदे 23)ममदापुर : दीपाली दशरथ कदम 24)हाळम : मीराबाई भीमराव चोपरे उपरोक्त माहितीही वाचकांच्या माहितीसाठी जी उपलब्ध ती देण्यात आलेली आहे निवडणूक विभागा

MB NEWS-हल्ला प्रकरण;१६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
  हल्ला प्रकरण;१६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......     रासप चे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर हल्ला झाल्याची घटना दि.19 सायंकाळच्या  सुमारास परळीतील छत्रपती शिवाजी  महाराज चौकात घडली आहे.या घटनेनंतर काही काळ  तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.           तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सरपंच व सदस्यपदाची रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. मात्र, आज सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी  महाराज चौकात कन्हेरवाडीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलचे प्रमुख माजी सरपंच व राष्ट्रीय समाज पक्षाचे  युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर हल्ला झाला. तसेच त्यांचे दोन समर्थक जखमी झाले आहेत.             राजेभाऊ फड हे आपल्या मित्रासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या  तिघांचा आणि फड यांच्यात वाद झाला. यातून फड यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची माहितीसमोर आलीआहे. राजेभाऊ फड व त्यांच्या समवेतच्या दोघांवर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.  हल्लानंतर घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणा

MB NEWS-ग्रामपंचायत निवडणूक : गुलाल कुणाला? आज फैसला!

इमेज
  ग्रामपंचायत निवडणूक : गुलाल कुणाला? आज फैसला! ग्रामपंचायतींसाठी चुरशीने झालेल्या मतदानानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. चौकाचौकांत रात्री जागू लागल्या आहेत. मंगळवारी (दि. 20) गुलाल कुणाला, याचा फैसला होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात होवून पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. परळी तालुक्यातील 80पैकी 76 ग्रामपंचायतींसाठी रविवारी अत्यंत चुरशीने 82.77टक्के मतदान झाले होते. विशेषतः, सर्वच पक्षांनी सरपंचपदावर ‘फोकस’ केल्यामुळे काही गावांमध्ये वरिष्ठ नेते व यंत्रणा ग्रामीण भागात कामाला लागली होती.  मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर आक्रमक कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी गावपुढार्‍यांचा कस लागणार आहे. तसेच तालुक्यातील संपूर्ण गावांतील निकाल  तालुक्यांतील प्रशासकीय इमारतींमध्ये असल्यामुळे मोठे पोलिसबळ तैनात करण्यात आले आहे. धाकधूक अन् विश्वासही बहुतांशी गावांमध्ये अत्यंत अटी-तटीने निवडणूक पार पडली. सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत; तरीही अनपेक्षित निकालाचीही धाकधूक आहे. त्यामुळे  मतमोजणीकडे उमेदवारांसह कार्यकर्

MB NEWS-प.पु.रंगनाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी साजरी

इमेज
  प.पु.रंगनाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी साजरी *परळी वैजनाथ  (प्रतिनिधी)* आज दि.19.12.2022 मार्गशीर्ष वद्य एकादशीला आर्य वैश्य समाजभूषण,वेदांत केसरी, ह.भ.प.रंगनाथ महाराजगुरुजी यांच्या 53व्या पुण्यतिथी निमित्ताने 53 जणांचे सर्वकष रक्त तपासणी शिबीर आर्य वैश्य समाज मंगल कार्यालयात संपन्न झाले तदनंतर दुपारी आकरा ते एक या वेळेत हभप. प्रभाकर महाराज झोलकर यांचे गुलालाचे कीर्तन संपन्न झाले. प्रभाकर महाराज झोलकर यांनी आपल्या रसाळ वाणीतून रंगनाथ महाराजांचा जीवनपट समजावून सांगितला,कीर्तन समारंभात रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेला गुलालाचा वर्षाव उपस्थित जनसमुदायांकडून करण्यात आला, शेवटी एकादशीच्या महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी येथील आर्य वैश्य समाज विश्वस्त मंडळ, आर्य वैश्य युवक मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ तसेच प्रणव पॅथॉलॉजी लॅब चे संचालक श्री. बरदापुरे यांचे सहकार्य लाभले.

MB NEWS-अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक

इमेज
  अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक बीड,  :  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान दिंद्रुड पोलिसात पाच संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने दिंद्रुड परिसर हादरला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात येथे एका शेतकऱ्याकडे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एक कुटुंब साल गडी म्हणून काम करते. दरम्यान शुक्रवारी सकाळी आई-वडील शेतात कामाला गेले असताना संशयीत आरोपी बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळ याने पीडित मुलीला एका उसाच्या फडात ओढत नेले. तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही 17 वर्षाची अल्पवयीन आहे. या घटनेमुळे दिंद्रुड व परिसरात खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात एका महिलेसह चार जणांवर बाललैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान दिंद्रुड पोलिसांनी तीन संशयीत आ

MB NEWS:ग्रामपंचायत निवडणूक: परळीत तीन फेऱ्यात मतमोजणी

इमेज
  ग्रामपंचायत निवडणूक: परळीत तीन फेऱ्यात मतमोजणी परळी वै तालुक्यातील ग्रामपंचायत फेरीनिहाय तीन फेऱ्यात मतमोजणी  होणार आहे.उदया सकाळी 10 वा प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात होईल. 1)पहील्या फेरीत एकूण-29 टेबलवर 28 ग्रामपंचायत ची मतमोजणी होईल. 2)दुस-या फेरीत एकूण-29टेबलवर 29ग्रामपंचायत ची मतमोजणी होईल. 3)तिस-या फेरीत एकूण -19 टेबलवर 19 ग्रामपंचायत ची मतमोजणी होईल. अशी एकूण -76 ग्रामपंचायत ची मतमोजणी फेरीनिहाय करण्यात येणार आहे. Click &watch : ●  *पहा:ग्रामपंचायत निवडणुक: परळीत मतमोजणीच्या तीन फेऱ्या |कोणत्या फेरीत कोणत्या गावांची मतमोजणी.* _*#mbnews # subscribe #like #share # comments*_                        परळी तालुक्यातील  76 ठिकाणी सरपंच व 625  इच्छुक सदस्य यांच्या निवडीची प्रक्रिया रविवार दि 18 रोजी संपन्न झाली असून सर्वांचे लक्ष्य उद्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.परळी तहसील कार्यालयात होणारी मतमोजणी 29 टेबलवर होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मंगळवार दि. 20  रोजी मतमोजणी होत आहे. तहसील कार

MB NEWS:ग्रामपंचायत निवडणूक: परळीतील अशी असणार मतमोजणी प्रक्रिया

इमेज
  ग्रामपंचायत निवडणूक: परळीतील अशी असणार मतमोजणी प्रक्रिया परळी तालुक्यातील  76 ठिकाणी सरपंच व 625  इच्छुक सदस्य यांच्या निवडीची प्रक्रिया रविवार दि 18 रोजी संपन्न झाली असून सर्वांचे लक्ष्य उद्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.परळी तहसील कार्यालयात होणारी मतमोजणी 29 टेबलवर होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. Click &watch: ● *मासिक एकादशी पर्वकाळात पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ दर्शनाला भाविकांची रीघ.* _#mbnews # subscribe #like #share #comments_ ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मंगळवार दि. 20  रोजी मतमोजणी होत आहे. तहसील कार्यालयात यासाठी 29 टेबल लावण्यात आले असून प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी अधिकारी, 3 सहाय्यक असे 4 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे प्रत्येक टेबलवर एक या पद्धतीने तीन फेऱ्या होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. ------------------------------------------------------- MB NEWS: LIVE: अंबाजोगाई -भागवतकथा (पंचम दिन) ● भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज जोशी उखळीकर ● स्थळ: पंचमुखी हनुम

MB NEWS-ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले

इमेज
  ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नाथ्रा येथे आज आ.धनंजय मुंडेंनी  मतदानाचा हक्क बजावला मात्र पंकजाताई व खा.डॉ.प्रीतमताई मतदानाला काही अपरिहार्य कारणास्तव  पोहचू शकल्या नाही.त्यामुळे मुंडे भगिनींचे मतदान राहिले आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व अधिवेशन सुरु असल्याने  खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.      नाथरा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी मुंडे भावंडांपैकीच अभय मुंडे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या विरोधातील वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने यांच्यासह प्रकाश मुंडे आणि रमेश मुंडे या दोन अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे निवडणुक झाली. राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांचे फोटो अभय मुंडे यांच्या प्रचाराच्या बॅनरवर एकत्र आले होते. मात्र, मतदानाच्या दिवशी रविवारी पंकजा मुंडे प्रकृती अस्वस्थतेमुळे मतदानाला येऊ शकल्या नाहीत.तर संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने खासदार डॉ. प्रितम मुंडे द

MB NEWS-मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात

इमेज
  मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आता बोगस मतदानाचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत असतानाही त्याच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात हा खळबळजनक प्रकार घडला. काय आहे संपूर्ण प्रकरण - बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत नोकरी करत आहे. मात्र, त्याच्या नावाने मतदान गावात झाल्याने खळबळ उडाली आहे. चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदार यादी क्रमांक 145 -शेख शकील बाबामिया अस मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सध्या गावामध्ये उपस्थित नाही. मात्र, तरीसुद्धा त्याच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले. यासंदर्भात झालेल्या मतदानावर आक्षेप घेत थेट तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र अधीक्षक यांच्यावर कारवाई केली, जावी अशी मागणी होत आहे. • 

MB NEWS-ईव्हीएम मशीनमध्ये टाकले चिकटद्रव्य !

इमेज
  ईव्हीएम मशीनमध्ये टाकले स्टिकफास्ट ! बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आला आहे.याबाबत तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आली. बीड जिल्ह्यात 700 पेक्षा अधिक ग्रामपंचायत साठी रविवारी मतदान प्रक्रिया सुरू झाली.महसूल आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असल्याने जिल्ह्यात फार कोठे गैरप्रकार झाल्याचे चित्र दिसून आले नाही. दरम्यान बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीन मध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. या प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता.मतदान प्रक्रिया देखील थांबवण्यात आली होती.सदरील प्रकार कोणी केला याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.

MB NEWS:निवडणूक कामात कसूर ; सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

इमेज
  निवडणूक कामात कसूर ; सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा  बीड- निवडणूक कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत वडवणी तालुक्यातील सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याचे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदान सुरू आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केला असल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रविंद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे,

MB NEWS-३३ महिन्यांपासून बंद असलेली परळी मार्गावरील पुणे-अमरावती एक्सप्रेस सुरु

इमेज
  ३३ महिन्यांपासून बंद असलेली परळी मार्गावरील पुणे-अमरावती एक्सप्रेस सुरु परळी  : ३३ महिन्यांपासून बंद असलेली परळी मार्गावरील पुणे-अमरावती एक्सप्रेस सुरु झाली आहे.यामुळे आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.        पुणे-अमरावती एक्सप्रेस रेल्वे गाडी चे शनिवारी सकाळी आठ वाजता परळी रेल्वे स्टेशनमध्ये आगमन झाले. ही रेल्वे गाडी पूर्वीप्रमाणे परळी मार्गे अमरावतीकडे धावली. या रेल्वेगाडीमुळे पुण्याहून परळीला येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. तसेच अमरावतीहून परळीमार्गे परत पुण्याला जाणाऱ्या अमरावती -पुणे या रेल्वे गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.  कोरोना प्रादुर्भावामुळे 22 मार्च 2020 पासून  पुणे- अमरावती व अमरावती -पुणे एक्सप्रेस गाडी तब्बल 33 महिने बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. नांदेड- पनवेल ही पुण्याला परळी मार्गे धावणारी रेल्वेगाडी नेहमी फुल्ल असते. त्यामुळे प्रवाशांची  गैरसोय व्हायची. आता ही गैरसोय दूर झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस पुणे -अमरावती आणि अमरावती- पुणे रेल्वेगाडी सुरु झाली आहे. या निर्णयाचे प्रवाशांकडून  स्वागत होत आहे. 

MB NEWS-मतदानासाठी येणाऱ्या तरुणाचा दुचाकी – कारच्या अपघातात मृत्यू !

इमेज
  मतदानासाठी येणाऱ्या तरुणाचा दुचाकी – कारच्या अपघातात मृत्यू ! नेकनूर – ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानासाठी औरंगाबाद येथून केज तालुक्यातील आनंदगाव सारणीकडे चाललेल्या दुचाकीस्वराची समोरून येणार्‍या कारला मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावर धडक बसल्याने यामध्ये दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. श्रीकृष्ण अनिल गायकवाड (वय 35) असे मयताचे नाव आहे. हा तरुण औरंगाबाद येथून दुचाकीवर क्र.(एमएच क्र.20 सीएक्स 1102) केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील ग्रामपंचायत मतदानासाठी जात असताना मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावरील गवारी पाटी नजीक समोरुन येणार्‍या कारला क्र.(एम.एच.20 एल 7009) या गाडीला धडक बसली. अपघातातील या युवकाला नेकनूरच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

MB NEWS-संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी भगीरथ बद्दल यांची निवड

इमेज
  संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी भगीरथ बद्दर यांची निवड  *संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी भगीरथ बद्दर यांची निवड*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी         साप्ताहिक परळी पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर यांची संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.              संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेचे राज्याध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी नुकतेच संपादक भगीरथ बद्दर यांना सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी नियुक्त केले असून या नियुक्तीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. भगीरथ बद्दर हे सर्व परिचित संपादक असून पत्रकारिता, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात ते महत्त्वपूर्ण कार्य करतात. यामुळेच त्यांची सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख म्हणून संस्थेने नियुक्ती केली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

MB NEWS-टोकवाडीच्या विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा- वाल्मीक मुंडे,संजय मुंडे

इमेज
  टोकवाडीच्या विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा- वाल्मीक मुंडे,संजय मुंडे   परळी (प्रतिनिधी)  टोकवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत टोकवाडी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातुन सर्वसामान्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असुन गावच्या सर्वांगीण विकासासाठी पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन पॅनल प्रमुख संजय मुंडे व सरपंच पदाचे उमेदवार वाल्मीक मुंडे यांनी केले आहे.  गत दोन निवडणुका बिनविरोध निघालेल्या टोकवाडी ग्रामपंयत निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे.टोकवाडी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातुन पॅनल प्रमुख संजय मुंडे व गावकर्यांनी सरपंच पदासाठी वाल्मीक मुंडे व इतर तेरा उमेदवार उभे केले आहेत.टोकवाडी ग्रामस्थांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळावा यासाठी तळमळीने कार्य करणारे असुन पायाभूत सुविधासह इतर सर्व विकासकामे करुन विकसित टोकवाडीसाठी टोकवाडी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारासमोरील छत्री,बकेट,दुरदर्शन संच,छताचा पंखा या चिन्हासमोरील बटन दाबुन विजयी करावे असे आवाहन पॅनल प्रमुख संजय मुंडे व सरपंच पदाचे उमेदवार वाल्मीक मुंडे यांनी केले आहे.

MB NEWS-बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : उद्धव ठाकरे

इमेज
  बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : उद्धव ठाकरे महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा लढा उभारला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पण अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई येथे आज (दि. १७) महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे म्‍हणाले, “आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला डिवचले त्यांच्या छाताड्यावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदाच अस दृष्य देशाने आणि जगाने पाहिलं असेल. कोणीही यायचं आणि डिवचून जायचं हे आता चालणार नाही. या मोर्चात सर्वपक्षीय झेंडे एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्र द्रोही या मोर्चात नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीसोबत लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तरी चालेल; पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड होऊ देणार नाही.

MB NEWS-रानबा गायकवाड यांच्या कुत्र्याची अंडी कथा संग्रहाचा 25 डिसेंबर रोजी प्रकाशन सोहळा

इमेज
  रानबा गायकवाड यांच्या कुत्र्याची अंडी कथा संग्रहाचा 25 डिसेंबर रोजी प्रकाशन सोहळा परळी ( प्रतिनिधी.)   ज्येष्ठ पत्रकार, लेखक, दिग्दर्शक, नाटककार रानबा गायकवाड यांच्या कुत्र्याची अंडी या कथासंग्रहाचे प्रकाशन परळीत 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लेखक रानबा गायकवाड यांनी केले आहे.     शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयात दिनांक 25 डिसेंबर रविवार रोजी सकाळी अकरा वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. अध्यक्षस्थान वैजनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी व्ही मेश्राम हे भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष वसंत मुंडे, परळी वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब वाघमारे, मराठवाडा साहित्य परिषद शाखा परळीचे अध्यक्ष चंदुलाल  बियाणी अ. भा. मराठी नाट्य परिषद परळीचे अध्यक्ष बाजीराव ( भैया) धर्माधिकारी, बीड जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष काँ.अजय बुरांडे, साहित्यिक तथा विचारवंत अजयकुमार गंडले, प्रसिद्ध साहित्यिक  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवा

MB NEWS-मालेवाडी ग्राम पंचायतमध्ये श्री अंधारेश्वर व लोकनेते गोपीनाथराव मुंडे विकास पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  मालेवाडी ग्राम पंचायतमध्ये श्री अंधारेश्वर व लोकनेते गोपीनाथराव मुंडे  विकास पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद  विकासाच्या मुद्यावर विजयाची खात्री - भूराज बदने   परळी वैजनाथ          माझी पत्नी सरपंच असतांना माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासाची गंगा आणली आहे. अनेक विकासकामांना गती दिली असुन ही गती कायम ठेवण्यासाठी मालेवाडीतील मतदार मला आशिर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास मालेवाडी ग्राम पंचायतमधील श्री अंधारेश्वर व लोकनेते गोपीनाथराव मुंडे  पॅनलच्या सरपंचपदाचे उमेदवार भुराज बदने यांनी व्यक्त केला. मालेवाडीत भूराज बदने यांच्या पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.        ग्राम पंचायत निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वांनी फेरी काढून प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे. मालेवाडीतही भुराज बदने यांनी सर्व उमेदवारांसह मतदारांच्या भेटी घेतल्या. मागील काळात झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडला आणि आगामी काळात करावयाच्या विकासकामांचा आराखडा सांगितला. यावेळी नागरीकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दि

MB NEWS-विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी आशिर्वाद द्यावेत - अरूण दहिफळे

इमेज
  खोडवा सावरगाव निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनविकास पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी आशिर्वाद द्यावेत - अरूण दहिफळे परळी वैजनाथ     माझ्या सरपंचपदाच्या गावात अनेक विकासकामे करून गावाला सुजलाम सुफलाम करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आगामी काळात विकासाची हीच गती कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा संधी देऊन गोपीनाथराव मुंडे साहेब जनविकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ.  मिनाबाई बाबू गोपले यांना आणि सर्व सदस्यांना मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन सरपंच तथा पॅनल प्रमुख अरूणराव दहिफळे यांनी केले आहे.         खोडवा सावरगाव ग्राम पंचायत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात अरूणराव दहिफळे यांच्या नेतृत्वाखालील गोपीनाथराव मुंडे साहेब जनविकास पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील दहा वर्षाच्या काळात गावातील रस्ते आणि पाण्याचा प्रश्न कायम सोडविला आहे. गाव दुष्काळी भागात असतानाही पाणी उपलब्ध करून दिले आहे. जवळच्या गावांना जोडणारे रस्ते पुर्ण केले असे सांगुन गावचा राहिलेला विकास पुर्ण करण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारा

MB NEWS-सच्चा कार्यकर्ता हरपला:राजेंद्र बांगर यांच्या निधनाबद्दल पंकजाताई मुंडेंनी केले दुःख व्यक्त*

इमेज
  सच्चा कार्यकर्ता हरपला:राजेंद्र बांगर यांच्या निधनाबद्दल  पंकजाताई मुंडेंनी केले दुःख व्यक्त बीड  ।दिनांक १६। राजेंद्र बांगर यांच्या निधनाने भाजपचा एक धडाडीचा आणि सच्चा कार्यकर्ता हरपला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी बांगर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    राजेंद्र बांगर यांचेवर पुण्यातील खासगी रुग्णालयात गेल्या कांही दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्यांचे दुःखद निधन झाले. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की,आज मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यालयातून मंगेश चिवटे यांचा निरोप आला आणि राजेंद्र बांगर यांच्या अकाऊंटमध्ये काही रक्कम जमा झाली आणि ती नाही तर पूर्ण रककम द्यावी लागेल यासाठी मी त्यांना उद्या बारा वाजता बोलवलं होत, पण दुर्दैवाने ही घटना घडली, त्यामुळे खूप चुटपुट लागली. मला जसं राजकारण कळत तसं राजेंद्र बांगर मला दिसतात... कितीही टेंशन आलं तरी काही नाही ताई, काही काळजी करू नका.. निवांत राहा... तब्येत चांगली ठेवा असं ते नेहमी सांगायचे आणि आज इतकं अचानक त्यांनी आपला निरोप घेतला  हे बघून खूप वाईट वाटल.. मला माझे दुःख व्यक्त

MB NEWS-लोखंडीच्या रुग्णालयासाठी ७९ पदांना मंजूरी

इमेज
  लोखंडीच्या रुग्णालयासाठी ७९ पदांना मंजूरी  बीड,  : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शेवटच्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत 'काय हवे ते मागा परंतु गरिबांना  चांगली रुग्णसेवा द्या' असे सांगीतलेले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयातील रिक्त पदांबाबत त्यांच्याकडे अहवाल पाठविन्यात आला होता. याला सावंत यांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवत ७९ पदे मंजूर केली. यामुळे बीड जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या सुधारणेसाठी बुस्टर डोस मिळाला असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले.       गुरुवारी (दि.१५) शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने  काल्पनिक कुशल ६८ आणि काल्पनिक अकुशल ११ अशा ७९  पदांना मान्यता दिल्याचे आदेश निघाले आहेत. याबत डॉ. सुरेश साबळे म्हणाले, बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयातनंतर सर्वात मोठे रुग्णालय लोखंडी सावरगाव येथे आहे. स्त्री  रुग्णालय व परिचर्या प्रशिक्षण केंद्र व मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्र असे भव्य दोन रुग्णालयांची उभारणी झाली. मात्र, १३ वर्षे दोन्ही भव्य रुग्णालये कार्यान्वित नव्हते. कोविडच्या काळात या दोन्

MB NEWS-◆डॉ. अजित नवले नवे अखिल भारतीय सहसचिव

इमेज
 ●शेतकरी प्रश्नांसाठी देशव्यापी संघर्षाची राष्ट्रीय अधिवेशनात किसान सभेची हाक ◆डॉ. अजित नवले नवे अखिल  भारतीय सहसचिव बीड / प्रतिनिधी अखिल भारतीय किसान सभेचे ३५ वे राष्ट्रीय अधिवेशन केरळ मधील त्रिचुर येथे संपन्न झाले. चार दिवस चाललेल्या अखिल भारतीय अधिवेशनास देशातील २६ राज्यांतील १ कोटी ३७ लाख शेतकरी सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे ७५६ प्रतिनिधी उपस्थित होते. किसान सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाने आगामी तीन वर्षासाठी १४९ जणांची अखिल भारतीय किसान कौन्सिल, ७७ जणांची केंद्रीय किसान कमिटी व २१ जणांच्या पदाधिकारी मंडळाची निवड केली. डॉ. अशोक ढवळे यांची अखिल भारतीय अध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली.  सरचिटणीसपदी विजू कृष्णन, कोषाध्यक्षपदी पी. कृष्णप्रसाद, ज्येष्ठ उपाध्यक्षपदी हन्नन मोल्ला तर अखिल भारतीय सहसचिवपदी डॉ. अजित नवले यांची अधिवेशनात निवड करण्यात आली.केंद्रीय किसान कमिटीवर महाराष्ट्रातून उमेश देशमुख व किसन गुजर यांची, तर सुभाष चौधरी, रडका कलांगडा, अर्जुन आडे यांची अखिल भारतीय किसान कौन्सिलवर निवड करण्यात आली. सरकारच्या नवउदारवादी आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून सुरू झालेल्या कृषी संकटाने भार