प.पु.रंगनाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी साजरी
*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*
आज दि.19.12.2022 मार्गशीर्ष वद्य एकादशीला आर्य वैश्य समाजभूषण,वेदांत केसरी, ह.भ.प.रंगनाथ महाराजगुरुजी यांच्या 53व्या पुण्यतिथी निमित्ताने 53 जणांचे सर्वकष रक्त तपासणी शिबीर आर्य वैश्य समाज मंगल कार्यालयात संपन्न झाले तदनंतर दुपारी आकरा ते एक या वेळेत हभप. प्रभाकर महाराज झोलकर यांचे गुलालाचे कीर्तन संपन्न झाले. प्रभाकर महाराज झोलकर यांनी आपल्या रसाळ वाणीतून रंगनाथ महाराजांचा जीवनपट समजावून सांगितला,कीर्तन समारंभात रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेला गुलालाचा वर्षाव उपस्थित जनसमुदायांकडून करण्यात आला, शेवटी एकादशीच्या महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी येथील आर्य वैश्य समाज विश्वस्त मंडळ, आर्य वैश्य युवक मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ तसेच प्रणव पॅथॉलॉजी लॅब चे संचालक श्री. बरदापुरे यांचे सहकार्य लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा