MB NEWS-बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : उद्धव ठाकरे

 बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : उद्धव ठाकरे





महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा लढा उभारला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पण अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई येथे आज (दि. १७) महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्‍हणाले, “आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला डिवचले त्यांच्या छाताड्यावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदाच अस दृष्य देशाने आणि जगाने पाहिलं असेल. कोणीही यायचं आणि डिवचून जायचं हे आता चालणार नाही. या मोर्चात सर्वपक्षीय झेंडे एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्र द्रोही या मोर्चात नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीसोबत लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तरी चालेल; पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड होऊ देणार नाही. असा कोणी प्रयत्न करेल त्याला गुडघ्यावर झुकण्यासाठी लावणारी ही खरी शिवसेना आहे, असेही ठाकरे यांनी ठणकावले.

राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात; पण त्याचा कोश्यारींना विसर पडलाय, असेही ठाकरे म्‍हणाले. सध्याचे पालकमंत्री मुंबईचा हिशेब स्क्वेअर फूटामध्ये करतात.या सरकारमध्ये बौद्धीक दारिद्य्र असलेले मंत्री आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही ठाकरे म्‍हणाले.











■ MB NEWS:LIVE 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार