युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले

 ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले




परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
       ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नाथ्रा येथे आजआ.धनंजय मुंडेंनी  मतदानाचा हक्क बजावला मात्र पंकजाताई व खा.डॉ.प्रीतमताई मतदानाला काही अपरिहार्य कारणास्तव  पोहचू शकल्या नाही.त्यामुळे मुंडे भगिनींचे मतदान राहिले आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व अधिवेशन सुरु असल्याने  खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
     नाथरा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी मुंडे भावंडांपैकीच अभय मुंडे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या विरोधातील वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने यांच्यासह प्रकाश मुंडे आणि रमेश मुंडे या दोन अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे निवडणुक झाली. राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांचे फोटो अभय मुंडे यांच्या प्रचाराच्या बॅनरवर एकत्र आले होते. मात्र, मतदानाच्या दिवशी रविवारी पंकजा मुंडे प्रकृती अस्वस्थतेमुळे मतदानाला येऊ शकल्या नाहीत.तर संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने खासदार डॉ. प्रितम मुंडे देखील मतदानाला येऊ शकल्या नाहीत, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. तर आ. धनंजय मुंडे यांनी मात्र आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या