इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-हल्ला प्रकरण;१६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 हल्ला प्रकरण;१६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल









परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

    रासप चे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर हल्ला झाल्याची घटना दि.19 सायंकाळच्या  सुमारास परळीतील छत्रपती शिवाजी  महाराज चौकात घडली आहे.या घटनेनंतर काही काळ  तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
          तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सरपंच व सदस्यपदाची रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. मात्र, आज सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी  महाराज चौकात कन्हेरवाडीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलचे प्रमुख माजी सरपंच व राष्ट्रीय समाज पक्षाचे  युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर हल्ला झाला. तसेच त्यांचे दोन समर्थक जखमी झाले आहेत.
            राजेभाऊ फड हे आपल्या मित्रासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या  तिघांचा आणि फड यांच्यात वाद झाला. यातून फड यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची माहितीसमोर आलीआहे. राजेभाऊ फड व त्यांच्या समवेतच्या दोघांवर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.  हल्लानंतर घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
   परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राजकिय वैरातुन जिवे मारण्याचा कट रचुन आरोपीतानी गैरकायद्याची मंडळी जमवुन राजाभाऊ फड व त्यांच्या साक्षीदाराना जिवेमारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेल्या कोयता, लोखंडी रॉड, दगडाने मारून जखमी केले तसेच त्यांची चार चाकी गाडी क्रं. HR-51-BE-0137 चे व इत्तर गाड्याचे काचा फोडुन नुकसान केले व जिवेमारण्याच्या धमक्या दिल्या व  जिल्हाधीकारी बीड यांचे जमावबंदी आदेशाचे उलघन केले.

या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीवरून गु.एं.न गुरनं 282 / 2022 कलम 143, 147, 148, 149, 323, 324, 307, 427, 506, 120 (ब) भादवी सह - कलम 135 मपोका नुसार 16 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळ हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या