युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-सच्चा कार्यकर्ता हरपला:राजेंद्र बांगर यांच्या निधनाबद्दल पंकजाताई मुंडेंनी केले दुःख व्यक्त*

 सच्चा कार्यकर्ता हरपला:राजेंद्र बांगर यांच्या निधनाबद्दल  पंकजाताई मुंडेंनी केले दुःख व्यक्त




बीड  ।दिनांक १६।

राजेंद्र बांगर यांच्या निधनाने भाजपचा एक धडाडीचा आणि सच्चा कार्यकर्ता हरपला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी बांगर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.


   राजेंद्र बांगर यांचेवर पुण्यातील खासगी रुग्णालयात गेल्या कांही दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्यांचे दुःखद निधन झाले. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की,आज मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यालयातून मंगेश चिवटे यांचा निरोप आला आणि राजेंद्र बांगर यांच्या अकाऊंटमध्ये काही रक्कम जमा झाली आणि ती नाही तर पूर्ण रककम द्यावी लागेल यासाठी मी त्यांना उद्या बारा वाजता बोलवलं होत, पण दुर्दैवाने ही घटना घडली, त्यामुळे खूप चुटपुट लागली.


मला जसं राजकारण कळत तसं राजेंद्र बांगर मला दिसतात... कितीही टेंशन आलं तरी काही नाही ताई, काही काळजी करू नका.. निवांत राहा... तब्येत चांगली ठेवा असं ते नेहमी सांगायचे आणि आज इतकं अचानक त्यांनी आपला निरोप घेतला  हे बघून खूप वाईट वाटल.. मला माझे दुःख व्यक्त करायला शब्द नाहीत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या