इमेज
  परळीत शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात; अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण परळी वैजनाथ | प्रतिनिधी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि. १९ जून रोजी परळी वैजनाथ येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उत्साहपूर्ण वातावरणात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", तसेच "उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. घोषणांच्या गजरात संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. भगव्या ध्वजाखाली एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा राखण्याचा आणि संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी सर्व शिवसैनिकांना वर्ध...

MB NEWS-लोखंडीच्या रुग्णालयासाठी ७९ पदांना मंजूरी

 लोखंडीच्या रुग्णालयासाठी ७९ पदांना मंजूरी 







बीड,  : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शेवटच्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत 'काय हवे ते मागा परंतु गरिबांना 

चांगली रुग्णसेवा द्या' असे सांगीतलेले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयातील रिक्त पदांबाबत त्यांच्याकडे अहवाल पाठविन्यात आला होता. याला सावंत यांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवत ७९ पदे मंजूर केली. यामुळे बीड जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या सुधारणेसाठी बुस्टर डोस मिळाला असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले.

 

    गुरुवारी (दि.१५) शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 

काल्पनिक कुशल ६८ आणि काल्पनिक अकुशल ११ अशा ७९ 

पदांना मान्यता दिल्याचे आदेश निघाले आहेत. याबत डॉ. सुरेश साबळे म्हणाले, बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयातनंतर सर्वात मोठे रुग्णालय लोखंडी सावरगाव येथे आहे. स्त्री 

रुग्णालय व परिचर्या प्रशिक्षण केंद्र व मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्र असे भव्य दोन रुग्णालयांची उभारणी झाली. मात्र, १३ वर्षे दोन्ही भव्य रुग्णालये कार्यान्वित नव्हते. कोविडच्या काळात या दोन्ही ठिकाणी जंबो कोविड रुग्णालय चालविण्यात आले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोविडवरील उपचार झाले. हजारो 

कोविड रुग्णांना लोखंडीच्या स्त्री रुग्णालय व वृद्धत्व उपचार व 

मानसिक आजार केंद्रात चालविलेल्या जंबो कोविड सेंटच्या माध्यमातून मिळाल्याचे डॉ. सुरेश साबळे म्हणाले.

मागील वर्षभरापासून दोन्ही ठिकाणी सिझेरिअन, डिलेव्हरी, इतर शस्त्रक्रीया व नेत्रशस्त्रक्रीया मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. मात्र, या ठिकाणी ७९ पदे रिक्त होते. त्यामुळे गरिब रुग्णांना उपचारासाठी अडचणी येत होत्या. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर व नंतर मुंबईला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतलेल्या बैठकीत हा मुद्दा लक्षात आणून देण्यात आला. दरम्यान मंत्री सावंत यांनी लोखंडीच्या वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्रातील रिक्त असलेले ७९ पदे भरण्यास मंजूरी देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. त्यानुसार गुरुवारी काल्पनिक कुशल ६८ व काल्पनिक अकुशल ११ अशा ७९ पदांना मंजूरी मिळाल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. या पदांसाठी दरवर्षी एक कोटी ८१ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही डॉ. सुरेश साबळे म्हणाले. मंजूर पदांमध्ये अधिपरिचारिका, आहार तज्ज्ञ, क्ष - किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, नेत्रशल्यचिकीत्सक, नेत्रशल्यचिकीत्सा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष, युनानी, होमिओपॅथीक), योगा व नॅचरोपॅथीस्ट, लिपीक, शिपाई, रक्तपेीढी परिचर, कक्षसेवक आदी पदांचा समावेश असल्याचेही डॉ. सुरेश साबळे म्हणाले.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या