MB NEWS-टोकवाडीच्या विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा- वाल्मीक मुंडे,संजय मुंडे

 टोकवाडीच्या विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा- वाल्मीक मुंडे,संजय मुंडे  



परळी (प्रतिनिधी)

 टोकवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत टोकवाडी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातुन सर्वसामान्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असुन गावच्या सर्वांगीण विकासासाठी पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन पॅनल प्रमुख संजय मुंडे व सरपंच पदाचे उमेदवार वाल्मीक मुंडे यांनी केले आहे.

 गत दोन निवडणुका बिनविरोध निघालेल्या टोकवाडी ग्रामपंयत निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे.टोकवाडी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातुन पॅनल प्रमुख संजय मुंडे व गावकर्यांनी सरपंच पदासाठी वाल्मीक मुंडे व इतर तेरा उमेदवार उभे केले आहेत.टोकवाडी ग्रामस्थांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळावा यासाठी तळमळीने कार्य करणारे असुन पायाभूत सुविधासह इतर सर्व विकासकामे करुन विकसित टोकवाडीसाठी टोकवाडी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारासमोरील छत्री,बकेट,दुरदर्शन संच,छताचा पंखा या चिन्हासमोरील बटन दाबुन विजयी करावे असे आवाहन पॅनल प्रमुख संजय मुंडे व सरपंच पदाचे उमेदवार वाल्मीक मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !