युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-३३ महिन्यांपासून बंद असलेली परळी मार्गावरील पुणे-अमरावती एक्सप्रेस सुरु

 ३३ महिन्यांपासून बंद असलेली परळी मार्गावरील पुणे-अमरावती एक्सप्रेस सुरु



परळी  : ३३ महिन्यांपासून बंद असलेली परळी मार्गावरील पुणे-अमरावती एक्सप्रेस सुरु झाली आहे.यामुळे आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

       पुणे-अमरावती एक्सप्रेस रेल्वे गाडी चे शनिवारी सकाळी आठ वाजता परळी रेल्वे स्टेशनमध्ये आगमन झाले. ही रेल्वे गाडी पूर्वीप्रमाणे परळी मार्गे अमरावतीकडे धावली. या रेल्वेगाडीमुळे पुण्याहून परळीला येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. तसेच अमरावतीहून परळीमार्गे परत पुण्याला जाणाऱ्या अमरावती -पुणे या रेल्वे गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 


कोरोना प्रादुर्भावामुळे 22 मार्च 2020 पासून  पुणे- अमरावती व अमरावती -पुणे एक्सप्रेस गाडी तब्बल 33 महिने बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. नांदेड- पनवेल ही पुण्याला परळी मार्गे धावणारी रेल्वेगाडी नेहमी फुल्ल असते. त्यामुळे प्रवाशांची  गैरसोय व्हायची. आता ही गैरसोय दूर झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस पुणे -अमरावती आणि अमरावती- पुणे रेल्वेगाडी सुरु झाली आहे. या निर्णयाचे प्रवाशांकडून  स्वागत होत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या