इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळी मतदारसंघात पंकजाताई मुंडेंचा करिश्मा ;साठ टक्के ग्रामपंचायतीवर भाजपची सरशी

 परळी मतदारसंघात  पंकजाताई मुंडेंचा करिश्मा ;साठ टक्के ग्रामपंचायतीवर भाजपची सरशी



सिरसाळा, नागापूर, घाटनांदुर, बर्दापूरसह मोठया ग्रा.प. वर वर्चस्व ;प्रतिष्ठेची कौठळीही घेतली ताब्यात


यशःश्री निवासस्थानी विजयी उमेदवारांचा गुलाल उधळून जल्लोष


परळी वैजनाथ।दिनांक २०।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा करिश्मा सोसायट्यांच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळाला. मतदारसंघातील सिरसाळा, नागापूर, घाटनांदुर, बर्दापूर सह सुमारे ६० टक्के ग्रामपंचायतीवर पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सरशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेली कौठळीची ग्रामपंचायतही पंकजाताईंच्या ताब्यात आली आहे.


    नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. परळी तालुक्यातील ७६ आणि मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते. परळी तालुक्यातील लिंबुटा, मांडेखेल, माळहिवरा/ गोपाळपूर आणि तळेगाव या ग्रा.पं. यापूर्वीच बिनविरोध आल्या आहेत. आज झालेल्या मतमोजणीनंतर लागेलेले निकाल लक्षात घेता पंकजाताई मुंडे यांचाच करिश्मा मतदारसंघावर असल्याचे सिध्द झाले. परळी मतदारसंघातील सुमारे  ७७ ग्रामपंचायतीवर भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. 

Click &watch:● *ग्रामपंचायत निवडणुक : जिल्ह्यात आमचीच सरशी | पुन्हा एकदा विधान | आपल्या दाव्यावर पंकजा मुंडे ठाम.* #mbnews #subscribe #like #share #comments



दगाबाज नेत्यांना झटका ; कौठळीत भाजप

--------------

भारतीय जनता पक्षाशी दगाबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी या निवडणुकीत धडा शिकवला. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेली  कौठळी येथील निवडणुक भाजपने जिंकली. याठिकाणी अनिता काटे या सरपंचपदी निवडून आल्या तर आचार्य टाकळी येथे सीमा घोडके या सरपंच झाल्या. या दोघांचे पंकजाताईंनी अभिनंदन केले आहे.


मोठया ग्रामपंचायतीवर वर्चस्व

----------

सिरसाळा, नागापूर, दादाहरी वडगाव, घाटनांदुर, बर्दापूर, गाढे पिंपळगाव, कन्हेरवाडी, पिंपळा धायगुडा, सायगाव, जवळगाव, पुस आदींसह अनेक मोठया ग्रामपंचायती पंकजाताई मुंडे यांच्या ताब्यात आल्या आहेत.  राष्ट्रवादीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा रोष मतदारांनी या निवडणुकीत मतपेटीतून व्यक्त केला.


Click &watch:● *परळीसह बीड जिल्ह्यात आमचीच सरशी : पंकजा मुंडे* #mbnews #subscribe #like #share #comments



यशःश्री निवासस्थानी जल्लोष ; पंकजाताईंनी पेढे वाटून केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन

------------

यशःश्री निवासस्थान सकाळपासूनच भाजपचे कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांनी गजबजून गेले होते. पंकजाताई आणि लोकनेते मुंडे साहेबांच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.गुलाल उधळून सर्वांनी एकच जल्लोष केला. पंकजाताईंनी स्वतःच्या हाताने  विजयी उमेदवारांना पेढे देऊन अभिनंदन केले. हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे, विजयाची घोडदौड आगामी विधानसभेतही  अशीच चालू ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या