MB NEWS-ग्रामपंचायत निवडणूक : गुलाल कुणाला? आज फैसला!

 ग्रामपंचायत निवडणूक : गुलाल कुणाला? आज फैसला!




ग्रामपंचायतींसाठी चुरशीने झालेल्या मतदानानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. चौकाचौकांत रात्री जागू लागल्या आहेत. मंगळवारी (दि. 20) गुलाल कुणाला, याचा फैसला होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात होवून पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

परळी तालुक्यातील 80पैकी 76 ग्रामपंचायतींसाठी रविवारी अत्यंत चुरशीने 82.77टक्के मतदान झाले होते. विशेषतः, सर्वच पक्षांनी सरपंचपदावर ‘फोकस’ केल्यामुळे काही गावांमध्ये वरिष्ठ नेते व यंत्रणा ग्रामीण भागात कामाला लागली होती.  मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर आक्रमक कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी गावपुढार्‍यांचा कस लागणार आहे. तसेच तालुक्यातील संपूर्ण गावांतील निकाल  तालुक्यांतील प्रशासकीय इमारतींमध्ये असल्यामुळे मोठे पोलिसबळ तैनात करण्यात आले आहे.

धाकधूक अन् विश्वासही

बहुतांशी गावांमध्ये अत्यंत अटी-तटीने निवडणूक पार पडली. सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत; तरीही अनपेक्षित निकालाचीही धाकधूक आहे. त्यामुळे  मतमोजणीकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदानानंतर अनेक उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरणार की अपेक्षाभंग होणार, हे आजच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार