इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी भगीरथ बद्दल यांची निवड

 संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी भगीरथ बद्दर यांची निवड 


*संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी भगीरथ बद्दर यांची निवड* 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी
        साप्ताहिक परळी पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर यांची संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
             संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेचे राज्याध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी नुकतेच संपादक भगीरथ बद्दर यांना सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख पदी नियुक्त केले असून या नियुक्तीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. भगीरथ बद्दर हे सर्व परिचित संपादक असून पत्रकारिता, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात ते महत्त्वपूर्ण कार्य करतात. यामुळेच त्यांची सामाजिक व राजकीय संपर्कप्रमुख म्हणून संस्थेने नियुक्ती केली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या