MB NEWS-ईव्हीएम मशीनमध्ये टाकले चिकटद्रव्य !

 ईव्हीएम मशीनमध्ये टाकले स्टिकफास्ट !



बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आला आहे.याबाबत तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आली.

बीड जिल्ह्यात 700 पेक्षा अधिक ग्रामपंचायत साठी रविवारी मतदान प्रक्रिया सुरू झाली.महसूल आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असल्याने जिल्ह्यात फार कोठे गैरप्रकार झाल्याचे चित्र दिसून आले नाही.

दरम्यान बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीन मध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली.

या प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता.मतदान प्रक्रिया देखील थांबवण्यात आली होती.सदरील प्रकार कोणी केला याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार