MB NEWS-मतदानासाठी येणाऱ्या तरुणाचा दुचाकी – कारच्या अपघातात मृत्यू !

 मतदानासाठी येणाऱ्या तरुणाचा दुचाकी – कारच्या अपघातात मृत्यू !





नेकनूर – ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानासाठी औरंगाबाद येथून केज तालुक्यातील आनंदगाव सारणीकडे चाललेल्या दुचाकीस्वराची समोरून येणार्‍या कारला मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावर धडक बसल्याने यामध्ये दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला.

श्रीकृष्ण अनिल गायकवाड (वय 35) असे मयताचे नाव आहे. हा तरुण औरंगाबाद येथून दुचाकीवर क्र.(एमएच क्र.20 सीएक्स 1102) केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील ग्रामपंचायत मतदानासाठी जात असताना मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावरील गवारी पाटी नजीक समोरुन येणार्‍या कारला क्र.(एम.एच.20 एल 7009) या गाडीला धडक बसली. अपघातातील या युवकाला नेकनूरच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !