युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी आशिर्वाद द्यावेत - अरूण दहिफळे

 खोडवा सावरगाव निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनविकास पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद






विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी आशिर्वाद द्यावेत - अरूण दहिफळे


परळी वैजनाथ

    माझ्या सरपंचपदाच्या गावात अनेक विकासकामे करून गावाला सुजलाम सुफलाम करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आगामी काळात विकासाची हीच गती कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा संधी देऊन गोपीनाथराव मुंडे साहेब जनविकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ.  मिनाबाई बाबू गोपले यांना आणि सर्व सदस्यांना मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन सरपंच तथा पॅनल प्रमुख अरूणराव दहिफळे यांनी केले आहे. 

       खोडवा सावरगाव ग्राम पंचायत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात अरूणराव दहिफळे यांच्या नेतृत्वाखालील गोपीनाथराव मुंडे साहेब जनविकास पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील दहा वर्षाच्या काळात गावातील रस्ते आणि पाण्याचा प्रश्न कायम सोडविला आहे. गाव दुष्काळी भागात असतानाही पाणी उपलब्ध करून दिले आहे. जवळच्या गावांना जोडणारे रस्ते पुर्ण केले असे सांगुन गावचा राहिलेला विकास पुर्ण करण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी आशिर्वाद द्यावेत असे आवाहन अरूणराव दहिफळे यांनी केले. 

        खोडवा सावरगाव ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सौ. मिनाबाई बाबू गोपले असुन वार्ड क्रमांक 1 मधुन सौ. प्रभावती श्रीराम दहिफळे वार्ड क्रमांक 2 मधुन उर्मिला अरूण दहिफळे, ज्ञानोबा श्रीराम दहिफळे, प्रभावती अंकुश दहिफळे, वार्ड क्रमांक 3 मधुन ज्योती नारायण दहिफळे, वार्ड क्रमांक 4 मधुन अरूण नारायण दहिफळे, महानंदा भिमा राठोड या निवडणुक लढवित आहेत. या पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या