MB NEWS-मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात

 मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात




आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आता बोगस मतदानाचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत असतानाही त्याच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात हा खळबळजनक प्रकार घडला.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत नोकरी करत आहे. मात्र, त्याच्या नावाने मतदान गावात झाल्याने खळबळ उडाली आहे. चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदार यादी क्रमांक 145 -शेख शकील बाबामिया अस मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तो सध्या गावामध्ये उपस्थित नाही. मात्र, तरीसुद्धा त्याच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले. यासंदर्भात झालेल्या मतदानावर आक्षेप घेत थेट तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र अधीक्षक यांच्यावर कारवाई केली, जावी अशी मागणी होत आहे.

• 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार