युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-मालेवाडी ग्राम पंचायतमध्ये श्री अंधारेश्वर व लोकनेते गोपीनाथराव मुंडे विकास पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद

 मालेवाडी ग्राम पंचायतमध्ये श्री अंधारेश्वर व लोकनेते गोपीनाथराव मुंडे  विकास पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद 



विकासाच्या मुद्यावर विजयाची खात्री - भूराज बदने 


परळी वैजनाथ 

        माझी पत्नी सरपंच असतांना माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासाची गंगा आणली आहे. अनेक विकासकामांना गती दिली असुन ही गती कायम ठेवण्यासाठी मालेवाडीतील मतदार मला आशिर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास मालेवाडी ग्राम पंचायतमधील श्री अंधारेश्वर व लोकनेते गोपीनाथराव मुंडे  पॅनलच्या सरपंचपदाचे उमेदवार भुराज बदने यांनी व्यक्त केला. मालेवाडीत भूराज बदने यांच्या पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. 

      ग्राम पंचायत निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वांनी फेरी काढून प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे. मालेवाडीतही भुराज बदने यांनी सर्व उमेदवारांसह मतदारांच्या भेटी घेतल्या. मागील काळात झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडला आणि आगामी काळात करावयाच्या विकासकामांचा आराखडा सांगितला. यावेळी नागरीकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून आगामी काळात मोठय़ा प्रमाणावर निधी आणण्याचा मनोदय व्यक्त केला. गावाचा सर्वांगीण विकास करून आधुनिक रूप देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगून मतदारांनी गावाच्या विकासासाठी आपल्यासह पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन भूराज बदने यांनी केले. 

        मालेवाडी ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये श्री अंधारेश्वर व गोपीनाथराव मुंडे साहेब पॅनलच्या वतीने वार्ड क्रमांक 1 मधुन आदिनाथ संभाजी बदने, उषाताई धोंडीराम गुट्टे, अहिल्याबाई गंगाधर बदने, वार्ड क्रमांक 2 मधुन सुरेखा सोमनाथ पोटभरे, संजय वैजनाथ कसबे, सिताबाई भगवान गुट्टे, वार्ड क्रमांक 3 मधुन सुभाष अण्णासाहेब कसबे, सिताबाई भगवान गुट्टे, धर्मराज वैजनाथ चव्हाण हे उमेदवार निवडणूक लढवित असुन सर्वांना विजयी करावे आवाहन करण्यात आले आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या