MB NEWS-रानबा गायकवाड यांच्या कुत्र्याची अंडी कथा संग्रहाचा 25 डिसेंबर रोजी प्रकाशन सोहळा

 रानबा गायकवाड यांच्या कुत्र्याची अंडी कथा संग्रहाचा 25 डिसेंबर रोजी प्रकाशन सोहळा



परळी ( प्रतिनिधी.)   ज्येष्ठ पत्रकार, लेखक, दिग्दर्शक, नाटककार रानबा गायकवाड यांच्या कुत्र्याची अंडी या कथासंग्रहाचे प्रकाशन परळीत 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लेखक रानबा गायकवाड यांनी केले आहे.

    शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयात दिनांक 25 डिसेंबर रविवार रोजी सकाळी अकरा वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. अध्यक्षस्थान वैजनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी व्ही मेश्राम हे भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष वसंत मुंडे, परळी वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब वाघमारे, मराठवाडा साहित्य परिषद शाखा परळीचे अध्यक्ष चंदुलाल  बियाणी अ. भा. मराठी नाट्य परिषद परळीचे अध्यक्ष बाजीराव ( भैया) धर्माधिकारी, बीड जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष काँ.अजय बुरांडे, साहित्यिक तथा विचारवंत अजयकुमार गंडले, प्रसिद्ध साहित्यिक  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अभ्यास मंडळाचे नवनियुक्त सदस्य प्रा डॉ. राजकुमार यल्लावाड प्रसिद्ध रंगकर्मी प्रा डॉ.  सिद्धार्थ तायडे तसेच जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद शाखा परळी चे अध्यक्ष कवी, गझलकार केशव कुकडे उर्फ मुक्त विहारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

      कुत्र्याची अंडी हा रानबा गायकवाड यांचा नवीन कथासंग्रह आहे त्यांचे यापूर्वी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या कथासंग्रहास प्रसिद्ध शाहीर, लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाचे लोककला विभाग प्रमुख डॉ.प्रा. गणेश चंदनशिवे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या प्रकाशन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवहान या ग्रंथाचे लेखक गायकवाड यांनी केले आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार